विद्यापीठात जिराफ दिसतो तेव्हा...
By Admin | Updated: August 8, 2015 00:56 IST2015-08-08T00:56:40+5:302015-08-08T00:56:40+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या घनदाट झाडीमध्ये एका उंच प्राण्याचे पाय दिसतात... कुतूहल म्हणून विद्यार्थी या प्राण्याला पाहायला जातात आणि समोर जिराफ पाहून

विद्यापीठात जिराफ दिसतो तेव्हा...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या घनदाट झाडीमध्ये एका उंच प्राण्याचे पाय दिसतात... कुतूहल म्हणून विद्यार्थी या प्राण्याला पाहायला जातात आणि समोर जिराफ पाहून आश्चर्यचकित होतात... परंतु, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या खाडीजवळील खाडीच्या परिसरात सायन्स पार्क उभारला जाणार आहे. सायन्स पार्कच्या उभारणीच्या
कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिराफ या प्राणाची प्रतिकृती येथे बसविली आहे.
विद्यापीठाच्या खेळाच्या मैदानाकडे जाणाऱ्या मार्गाजवळच्या खाडीच्या परिसरात हा जिराफ बसविण्यात आला आहे. झाडीमध्ये तो दिसून येत नसला तरी अभ्यास करण्यासाठी खाडीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आकर्षित करून घेतोे. विद्यापीठाच्या सायन्स पार्कमध्ये विविध प्राण्यांच्या प्रतिकृती बसविल्या जाणार आहेत. तसेच खाडीमधील नैसर्गिक जीव, वनस्पती यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. विज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना या सायन्स पार्कच्या माध्यमातून संशोधनासाठी आवश्यक असलेले पूरक घटक उपलब्ध व्हावेत, अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे.
याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, की विद्यापीठाच्या इमारतीजवळील खाडीमध्ये अनेक वनस्पती व प्राणी आहेत. या खाडीतील जैवविविधता जपली जाणार आहे. खाडीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी सोडले जाईल. या पाण्यात जाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ पदार्थापासून एक होडी तयार करण्यात आली आहे. सायन्स पार्कच्या भोवताली फिरण्यासाठी ट्रॅक केला जाणार आहे. (प्रतिनिधी)