बेस्ट सिटीसाठी दर्शन बसला मुहूर्त कधी?

By Admin | Updated: March 10, 2015 04:55 IST2015-03-10T04:55:33+5:302015-03-10T04:55:33+5:30

उत्पन्नवाढीच्या अपेक्षेने पीसीएमटी - पीएमपीच्या विलीनीकरणानंतर पीएमपीचा जन्म होऊन ७ वर्षे लोटली आहेत. मात्र, पीएमपीकडून अद्यापही पुणे दर्शनच्या

When did the bachelor meet for the best city? | बेस्ट सिटीसाठी दर्शन बसला मुहूर्त कधी?

बेस्ट सिटीसाठी दर्शन बसला मुहूर्त कधी?

अंकुश जगताप, पिंपरी
उत्पन्नवाढीच्या अपेक्षेने पीसीएमटी - पीएमपीच्या विलीनीकरणानंतर पीएमपीचा जन्म होऊन ७ वर्षे लोटली आहेत. मात्र, पीएमपीकडून अद्यापही पुणे दर्शनच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडसाठी पिंपरी-चिंचवड दर्शनची सुविधा देणाऱ्या बसेस उपलब्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे दर्शनला उद्योगनगरीचे वावडे असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे. तर शहराचे बिरुद मिरवणाऱ्या महापालिकेनेही अशा प्रकारचा ठराव पीएमपी प्रशासनाला पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे शहरातील वैभवाच्या, अभिमानाच्या बाबी झाकोळल्या जात असून, ते कोण्या हौशी पर्यटकांची नजर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
जुळी शहरे समजल्या जाणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पूर्वी महापालिकांच्या दोन वेगवेगळ्या परिवहन संस्था होत्या. एकाच मार्गावर या दोन्ही संस्थांच्या बसेस एकामागून एक धावत असल्याने प्रवाशांची पळवापळवी, त्यामुळे मागून येणाऱ्या बसला प्रवासी कमी मिळाल्याने होणारे नुकसान अशी कारणे देत दोन्ही संस्थांचे २००७ साली विलीनीकरण केले गेले. यापूर्वीच पुणे शहर परिसरात पुणे दर्शनसाठी वातानुकूलित २ बसद्वारे ही सेवा सुरू होती व आजही आहे. मात्र, पीएमपी स्थापनेनंतरही वेगळी ओळख असलेल्या उद्योगनगरीतील वैभवाच्या व विरंगुळा स्थळांची पाहणी करण्यासाठी या प्रशासनाने अशी सेवा उपलब्ध करण्याचा विचार केला नाही. वास्तविक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पीएमपीने पुढाकार घेत असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, पीएमपीने परावलंबी वृत्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून काही मिळतेय का, याचा विचार करीत बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या कामी बससाठी खर्चासाठी छदामाचीही तरतूद केलेली नाही. यासाठी साधे सर्वेक्षणही केले नसल्याचे उघड होत आहे. त्याचबरोबर महापालिकेनेही पीएमपीला असा ठराव अद्याप पाठविला नाही.
परिणामी, शहरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची कुचंबना होत आहे. त्यांना शहरात फिरण्यासाठी रेल्वे, बस, रिक्षा, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी जादा पैसे खर्चण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. याचबरोबर पुण्यासह पिंपरी-चिंचवड पाहण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यासाठी स्वतंत्ररीत्या तजवीज करावी लागत आहे.

Web Title: When did the bachelor meet for the best city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.