शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात बोलू लागतात..., पुण्यातील ‘शिवसृष्टीत’ अनोखी अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 5:58 PM

'शिवसृष्टी’ हे अशियातील सर्वात भव्य असे ऐतिहासिक थीम पार्क

पुणे : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा द्रष्टा राजा, युद्धाभ्यास आणि राजनितीमधील ‘चाणक्य’ अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती आजवर शिवचरित्रातून वाचली असेल किंवा इतिहास अभ्यासकांच्या विचारांमधून ऐकायला मिळाली असेल. पण कल्पना करा, प्रत्यक्षात जर शिवाजी महाराज बोलू लागले तर! न-हे आंबेगाव येथे साकारण्यात आलेल्या ‘शिवसृष्टी’मध्ये हा अनुभव शिवप्रेमींना मिळणार आहे. ’मँड मँपिंग’ या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिवाजीमहाराजांचा पुतळा बोलका केलायं. याद्वारे जणू साक्षात शिवाजी महाराजच समोर उभे राहून बोलत असल्याचा फिल येतो अन अंगावर रोमांच उभे राहातात.

’अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती महाराजांचा सोळाव्या शतकातील ‘शिवकाळ ’हा ‘शिवसृष्टी’ मधून पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने साकारल्या जाणा-या ‘शिवसृष्टी’ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या शिवजयंतीदिनी (दि.19) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव उपस्थित राहाणार आहेत. त्यानंतर दि. 20 फेब्रृवारीपासून ही शिवसृष्टी सामान्यांसाठी खुली होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वस्त जगदीश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्वस्त विनीत कुबेर व ‘शिवसृष्टी’चे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार उपस्थित होते.

"शिवसृष्टी’ हे अशियातील सर्वात भव्य असे ऐतिहासिक थीम पार्क असून, त्याचा पहिला टप्पा असलेल्या ’सरकारवाडा’ मध्ये भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउददेशीय सभागृह उभारण्यात आले आहे. याशिवाय देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड व विशाळगड या गड-किल्ल्यांची सफर घडविणारे ‘दुर्गवैभव’, शिवछत्रपतींच्या काळात वापर असलेल्या शस्त्रांचे ’रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन अशी विविध दालने आणि महाराजांची आग्रा येथून झालेल्या सुटकेची विशेष शो च्या माध्यमातून घडणारी सफर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर दुस-या टप्प्यात भवानी माता स्मारक, राजसभा व डार्क राईड, रंगमंडल तर तिस-या टप्प्यात माची, गंगासागर, बहुविध आकर्षण केंद्र, कोकण आदींचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात बाजारपेठ, प्रेक्षागृह, वाहनतळ व अश्वारोहण, लँडस्केप-हार्डस्केप आदी कामे पुढील दोन वर्षांच्या काळात पूर्ण होतील असे कदम यांनी सांगितले.

शिवसृष्टीची वैशिष्ट्ये

- किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मँपिग; होलोग्राफी, अँनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, थ्री डी प्रोजेक्शन, मँपिंग अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर-  या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च 438 कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यात 60 कोटी रुपये देणगीदारांकडून उपलब्ध. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या 12 हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांमधून तसेच जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून जमा केलेल्या निधीचाही सदुपयोग-  मुख्यमंत्र्यांनी कँबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रकल्पाला केले 50 कोटी रुपये मंजूर.-  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटन धोरण 2016 अंतर्गत प्रकल्पाला ‘मेगा टुरिझम प्रोजेक्ट म्हणून मान्यता-  येत्या 20 फेब्रृवारीपासून शिवसृष्टीचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 350 रुपये मोजावे लागणार; आॅनलाइन नोंदणीद्वारेही तिकिट बुक करणे शक्य.

टॅग्स :ambegaonआंबेगावBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजcultureसांस्कृतिकSocialसामाजिक