शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्यास अडचण काय? महेश लांडगेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 17:02 IST

देशभरात ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजत आहे

पुणे : देशभरात ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजत आहे. अनेक ठिकाणी या सिनेमासाठी हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. तर काही ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करण्यावरून वाद निर्माण होत आहे. काश्मीरातील पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा सिनेमा प्रेरित आहे. बहुतांश भाजपा शासित राज्यांमध्ये द काश्मीर फाइल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही द काश्मीर फाइल्स करमुक्त करावा अशी मागणी पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. 

मग महाराष्ट्रात अडचण काय ? 

‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, कनार्टक, त्रिपुरा, गोवा आणि आता उत्तरप्रदेश सरकारने करमुक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडे मागणी करुनही अद्याप निर्णय घेतला जात नाही. अडचण काय आहे? असा सवाल त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया   ''द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला'' 

हा चित्रपट टॅक्स फ्री करावा - नितेश राणे

जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणारा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा. ज्यामुळे जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले याचे योग्य आणि खरे चित्रिकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेला पाहता येईल. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा, ही विनंती, असे पत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.

टॅग्स :cinemaसिनेमाPoliticsराजकारणMLAआमदारartकलाJammu Kashmirजम्मू-काश्मीर