शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायदान यंत्रणेवरील विश्वास गमावून बसलो, तर उरते काय? माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 23:00 IST

सरकारकडून पद स्वीकारण्याचा मोह टाळावा

ठळक मुद्देनिवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत

पुणे : जे खटले वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यात न्याय मिळावा यासाठी नागरिक मोठ्या आशेने न्यायालयात येतात. परंतु, न्यायव्यवस्थेतील जबाबदार व्यक्तीने राजकीय पदाचा स्वीकार केल्याने नागरिकांच्या मनात संशय येतो. तो अयोग्य आहे, असे म्हणता येणार नाही. न्यायाधीश असे विकले जात असल्यास, याचा अर्थ या सगळ्याचा सरकारबरोबर काही संबंध आहे, असे म्हणावे लागेल. अशाने न्यायदान यंत्रणेवरील विश्वास गमावून बसलो, तर उरते काय? असा प्रश्न उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी उपस्थित केला आहे. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत. या संदर्भात माजी न्यायाधीश सावंत यांना विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारे पदे स्वीकारण्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘न्यायधीशाने राजकीय पदे घेऊ नयेत. निदान काही वर्षे तरी घेऊ नयेत. स्पष्टच सांगायचे झाल्यास ती घेऊच नयेत. असे माझे ठाम मत आहे. सरकारने दिलेली अशा प्रकारची पदे शक्यतो टाळावीत. लोकांनी दिलेले पद असल्यास ते एक वेळ मान्य होईल; मात्र सरकारकडून मिळालेल्या पदामुळे  वेगळ्या प्रकारचा संदेश समाजात जातो. त्याचे पडसाद नकारात्मक पद्धतीने समाजमनावर पडतात. याचा विचार संबंधित व्यक्तींनी करण्याची गरज आहे. सरकारकडून स्वीकारण्यात आलेल्या पदामुळे न्यायदान यंत्रणा ही जी स्वतंत्र व्यवस्था आहे, त्या स्वतंत्र यंत्रणेवर आघात झाल्याशिवाय राहत नाही.’’ या सगळ्यामुळे न्यायदानाबद्दल विश्वास राहत नाही. लोकांचा विश्वास हे न्यायदानाचे भांडवल आहे. तेच गमावून बसलो, तर न्यायदानात उरते काय? नि:पक्षपणे न्यायदान व्हावे, यासाठी लोक न्यायालयात येतात, हे लक्षात घ्यावे. अशामुळे न्यायपालिकेची विश्वासार्हता आणि नि:स्पृहता धोक्यात येतेच, हे समजून घ्यावे. लोकांच्या मनात न्यायदान यंत्रणेबद्दल विश्वास राहत नाही. लोक न्यायदान यंत्रणेकडे न्याय मिळावा म्हणून येतात. जे खटले वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यात न्याय मिळावा यासाठी ते मोठ्या आशेने न्यायालयात येतात. यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत. सरकारच्या बाजूने ज्यांनी निर्णय दिले, अशा न्यायाधीशांना पदे दिली गेली आहेत. असे प्रकार सर्रास होऊ लागले, तर न्यायदान यंत्रणा ही स्वतंत्र राहिली नसून ती राजकीय पक्षांना विकली गेली आहे, असे लोकांना वाटू लागेल, अशी भीती सावंत यांनी या वेळी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेRanjan Gogoiरंजन गोगोईCourtन्यायालयGovernmentसरकार