शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पुणे तिथे काय उणे :सिग्नलवरील वाहनचालकांसाठी टाकले कापडी  छप्पर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 11:05 IST

कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. हजारो  वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत.

पुणे :  कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. हजारो  वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. मध्यवस्तीतील तीन चौकांमधील ७ सिग्नलवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून लवकरच अजून १३ ठिकाणी अशी सुविधा करण्यात येणार आहे. 

यामध्ये पहिल्या टप्प्यात फरासखाना चौक, अप्पा बळवंत चौक, सिटी पोस्ट चौक येथील ७ सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे. फरासखाना चौकात ६० बाय ४० आणि ५० बाय ३० आकाराच्या हिरव्या कापडाचे छप्पर, अप्पा बळवंत चौकामध्ये ३० बाय २०, २० बाय २० आणि ४० बाय २० आकाराचे छप्पर तसेच सिटी पोस्ट चौकामध्ये ६० बाय ३० आणि ४० बाय २० आकाराचे छप्पर लावण्यात आले आहे. प्रत्येकी ३ फूट रुंदीचे कापड शिवून त्याद्वारे मोठे छप्पर तयार करण्यात आले आहे. याशिवाय १२ आणि ४ एमएम आकारच्या दो-यांचा वापर करुन हे छप्पर बांधण्यात आले आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याबाबत रासने म्हणाले, पुण्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलकरीता चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे त्यांच्याकरीता ही सुविधा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला असून त्यांच्या प्रेरणेतून पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुढील काही दिवसात इतरही चौकात अशी सुविधा देण्यात येणार आहे. कापडी छप्परमुळे उन्हाचे प्रमाण कमी झाले असून रस्ते तापण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. 

कापडाचे छप्पर असल्याने आपोआप होतेय वाहतूक नियमांची अंमलबजावणीप्रत्येक चौकातील सिग्नलवर छप्पर बांधताना वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होईल, याची काळजी कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे संपण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त सावली पडेल, अशा सुविधा करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक देखील झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे रहात आहेत. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकSocial Viralसोशल व्हायरल