शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सुनील कांबळेंना उमेदवारी कशाच्या बळावर दिली ? भाजप पक्षश्रेष्ठींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 14:24 IST

एकाच घरात कितीदा देणार उमेदवारी?

ठळक मुद्देकॅन्टोन्मेंट मतदारसंघातून २२ जणांनी इच्छुक म्हणून भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे केले होते अर्ज

पुणे : राजकारणातील घराणेशाहीला विरोध करीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याची भाषा करणाऱ्या भाजपने पुण्यातील कॅन्टोंमेंट मतदारसंघात माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षश्रेष्ठींनी कांबळे यांना कशाच्या जोरावर उमेदवारी दिली, एकाच घरात कितीदा उमेदवारी देणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.  दोन वेळा आमदारकी, एकदा मंत्रिपद तसेच नगरसेवकपद अशा प्रकारे पक्षाने सहकार्य केले असताना आता पुन्हा कांबळेंनाच कशाकरिता उमेदवारी, याचे उत्तर कार्यकर्त्यांना हवे आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून २२ जणांनी इच्छुक म्हणून भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे अर्ज केले होते. त्यातील अनेकांच्या मुलाखती झाल्या. प्रत्यक्षात मुलाखती घेणे हा केवळ दिखावाच असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सुनील कांबळे यांना उमेदवारी दिल्याने त्या २२ इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच परखड शब्दांत पक्षश्रेष्ठींना सुनावले आहे. दिलीप कांबळे हे लोहियानगर या भागात राहतात. त्यांनी मागील वेळेस कॅन्टोंमेंट भागातून फॉर्म भरला. तेव्हादेखील मूळ कॅन्टोन्मेंटमधील कार्यकर्ता दुखावला गेला होता. यंदादेखील मार्केट यार्ड भागात राहणारे सुनील कांबळे कॅन्टोंमेंटमधून निवडणूक लढवत आहेत. अशा वेळी मूळच्या उमेदवारांना डावलून बाहेरील उमेदवारांना तिकीट देण्याचा अट्टहास केला जात आहे? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. उमेदवारी मिळावी याकरिता पक्षाचे राष्ट्रीय संघटक विजय पुराणिक व खासदार गिरीश बापट यांना परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर देखील त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. शेवटी एकाच कुटुंबातल्या किती जणांना तिकीट देणार? यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीला कांबळे कसे सामोरे जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ................दिलीप कांबळे यांच्या उमेदवारीविषयी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यात आली. त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. पक्षाने आम्हाला विचारात घेतले नाही याचे वाईट वाटते. एकाच घरात दोन वेळा आमदारकी, एकदा मंत्रिपद दिले असताना या वेळी पुन्हा त्यांच्या भावाला तिकीट देण्यात आले. आम्ही कार्यकर्त्यांनी काय शेवटपर्यंत गर्दीच करायची का, सतरंज्याच्याच उचलायच्या का, चार वेळा नगरसेवक पदाकरिता उभा राहिलो त्यापैकी दोनदा निवडून आलो. पक्षाला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून आले आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आता बंडखोरीच्या तयारीत आहोत. - बापू कांबळे, माजी नगरसेवक ......................गेल्या तीस वर्षांपासून भाजप पक्षाचे काम करीत आहे. २० वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. अशा वेळी आम्हाला डावलून सुनील कांबळे यांना नेमक्या कशाच्या जोरावर तिक ीट मिळाले हे पक्षश्रेष्ठींनी सांगावे. यात सुनील कांबळे यांची मुलाखत न घेतादेखील त्यांना उमेदवारी देण्यात आली, याचे कारण काय? २००९ ते २०१९ पर्यंत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र नेहमीच डावलण्यात आलो. कांबळे यांचा कॅन्टोंमेंट मतदारसंघाशी काय संबंध? गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाºयांना जर पक्ष तिकीट देणार असेल तर आता अशा उमेदवारांचा प्रचार करायचा का? असा प्रश्न पडला आहे. शेवटी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेणार आहे. - डॉ. भरत वैरागे, अध्यक्ष, भाजप अनुसूचित जाती-मोर्चा, माजी नगरसेवक 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा