शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकांमध्ये आपण नक्की करणार तरी काय ? मनसे कार्यकर्त्यांचा उद्वेगजनक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:05 IST

मनसेचे महापालिकेत तब्बल २९ नगरसेवक होते. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले होते. ९ चे २९ झाले, मात्र या २९ जणांची महापालिकेतील सलग ५ वर्षे फक्त तटस्थ राहण्यात गेली.

पुणे : भारतीय जनता पक्षाला लोकसभेला मदत, विधानसभेला विरोध. आता महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरेंबरोबर युतीची चर्चा, तर त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल तास-दीड तासांची भेट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा असलेले अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या सतत अनिश्चित असलेल्या भूमिकांनी आता तळातील मनसेचे कार्यकर्ते, महापालिका निवडणुकीत आपण नक्की करायचे तरी काय? असा उद्वेगजनक सवाल करू लागले आहेत. त्रस्त झालेल्या या कार्यकर्त्यांना सांभाळताना पदाधिकाऱ्यांच्याही नाकीनऊ येत आहेत.

पुणे शहरात ही परिस्थिती फारच तीव्र झाली आहे. मनसेचे महापालिकेत तब्बल २९ नगरसेवक होते. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले होते. ९ चे २९ झाले, मात्र या २९ जणांची महापालिकेतील सलग ५ वर्षे फक्त तटस्थ राहण्यात गेली. त्यामुळेच पंचवार्षिक मुदत संपताच मनसेला गळती लागली व २९ नगरसेवकांचे संघटन निवडणुकीनंतर अवघ्या २ नगरसेवकांवर आले. त्यातलेही एक नगरसेवक पक्ष सोडून गेले. इतकी पडझड होऊनही पुण्यात राज यांना मानणारा फार मोठा गट आहे. त्यातील अनेकांना महापालिका निवडणूक लढवायची आहे. सुरुवातीला भाजपबरोबर जावे या मताचे ते होते. मात्र, राज यांचा त्याबाबत काहीच निर्णय होत नव्हता. मग अचानक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जाण्याचा विषय निघाला. खुद्द राज यांनीच तो काढला. त्यानंतर जणू युती झालीच अशा समजामध्ये कार्यकर्ते होते, तर राज यांनी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने सगळ्या इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले आहे.

मतांमध्ये परावर्तित होत नसली तरीही राज आजही गर्दी खेचणारे नेते आहेत. एखाद्या घटनेवर त्यांच्या प्रतिक्रियांना माध्यमांमध्ये आजही प्रसिद्धी दिली जाते. त्यामुळेच निवडून आलेला एकही लोकप्रतिनिधी पदरी नसतानाही त्यांनी आपल्याबरोबर यावे यासाठी दिल्लीपासून गल्लीत असलेल्या भाजपसह गोंधळलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही जवळपास प्रत्येक निवडणुकीत प्रयत्नशील असते. मात्र, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निर्णय घेत गेल्याने त्यात मनसेच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची चांगलीच होरपळ झाली आहे. आता महापालिका निवडणूक तोंडावर आली तरीही अजून राज यांचा काहीच निर्णय होत नसल्याने त्यांच्यापैकी अनेक जण वैतागले आहेत. त्यांच्यापैकीच काहींनी महापालिका निवडणुकीत आपण नक्की करणार तरी काय? असा त्रासिक प्रश्न केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनसेच्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांना फारसा रस नव्हता. विधानसभेसाठी मात्र अनेक जण इच्छुक होते. राज यांनी लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा दिला. मात्र, विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. त्यात राज्यभरात त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. आता महापालिका निवडणुकीत मात्र त्यांच्याबरोबर असणाऱ्या अनेकांना रस आहे. राजकीय पक्षांचे काम करतो आहोत तर आपली लोकप्रियता तपासण्याची एक संधी म्हणूनच कार्यकर्त्यांकडून स्थानिक निवडणुकीकडे पाहिले जाते. मात्र, त्याबाबतीत काहीच निर्णय होत नसल्याने सगळे इच्छुक त्रस्त झाले आहेत.

आमची भांडणे महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीत’ असे सांगून आमचे नेते राज यांनी सकारात्मकता दाखवली आहे. आता समोरचा पक्ष काहीच करत नसेल तर त्यात मनसेचा दोष नाही. आमचा आमच्या नेत्याच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे, मनसैनिक त्रस्त झाले, पदाधिकारी वैतागले, इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले यात काहीही तथ्य नाही. मनसैनिक इतका लेचापेचा नाही. - योगेश खैरे, प्रदेश प्रवक्ते, मनसे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024