शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 09:00 IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध वयाेगटातील, क्षेत्रातील लाेकांना स्वातंत्र्याचा अर्थ काय वाटताे ? हे जाणून घेण्याचा लाेकमतने प्रयत्न केला.

राहुल गायकवाड 

पुणे : 15 अाॅगस्ट 1947 साली भारत इंग्रजांच्या अधिपत्यातून स्वतंत्र झाला. यानंतर अनेक संस्कृती, प्रदेश, भाषा, जाती, धर्म असलेल्या या देशाची वाटचाल एका लाेकशाहीवादी देशाकडे सुरु झाली. 1950 पासून भारत हा एका नव्या संविधानावर चालू लागला. या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे देशाला दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबराेबरच अनेक प्रकारची स्वातंत्र्ये भारतीयांना मिळाली. स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतर भारतीयांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ नेमका काय अाहे ? संविधानाने बहाल केलेली स्वातंत्र्ये त्यांना मिळाली अाहेत का ? याचा शाेध घेण्याचा प्रयत्न लाेकमतने केला. यात विविध वयाेगटातील तसेच विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी अापली मते नाेंदवली. 

    घरातून बाहेर पडताना तु कुठे चालली अाहेस ? असे विचारुन काेणी टाेकले नाही तर मुली स्वतंत्र असल्याचे वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या हेमांगीला वाटते. तर काेणाच्याही दडपनाखाली न येता मनासारखं वागता येणं यात गंधर्व या तरुणाला स्वातंत्र्य वाटतं. वाकडेवाडीतील गॅरेजवाला अापल्या कामातच स्वातंत्र्याचा शाेध घेताे. त्याला त्याच्या मनाप्रमाणे काम करता येतं यातचं त्याला त्याच्या स्वातंत्र्याचा अर्थ सापडताे. भांडारकर राेडवरील एका चप्पल दुरुस्त करणाऱ्याला त्याचा व्यवसाय कुठल्याही दडपणाखाली न राहता करता येताे हेच स्वातंत्र्य वाटते. अनेक तरुणांना सिगारेट अाेढणे, गाड्यांवर सुसाट फिरणे यात स्वातंत्र्य वाटते, परंतु याबाबत टुरिस्टची गाडी चालविणाऱ्याचे मत जरा वेगळे अाहे. सिगारेट फुंकण्यापेक्षा चांगलं शिक्षण घेऊन समाजाला पुढे घेऊन जाणे म्हणजे स्वातंत्र्य असल्याचे ताे म्हणताे. 

    सिक्युरिटी गार्डचं काम करणाऱ्या एका काकांना त्यांच्या मुलांना त्यांना हवं तसं शिक्षण ते देऊ शकले हाच त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ अाहे. तर चहाचा व्यवसाय करुन कुटुंबाला हातभार लावण्यात चहावाल्या काकुंना त्यांचे स्वातंत्र्य सापडते. अायटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांची स्वातंत्र्याची मतं काहीशी वेगळी अाहेत. जेव्हा मुला-मुलींना समानतेने वागवले जाईल यातच स्वातंत्र्य असल्याचे एका तरुणीला वाटते तर रात्री अपरात्री मुलींना रस्त्यावरुन कुठलिही भीती मनात न बाळगता फिरता येईल तेव्हा खरे स्वातंत्र्य मिळाल्याचे दुसरीला वाटते. 

टॅग्स :PuneपुणेIndependence Dayस्वातंत्र्य दिवसStudentविद्यार्थीnewsबातम्या