शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सोडून इतरांच्या पाण्याचे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 02:51 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून पुणे महापालिकेच्या पाणी वापरावर टाच आणली जात आहे. मात्र, केवळ पालिकाच नाही तर जलसंपदा विभागाकडे बिगर सिंचन ग्राहक म्हणून सुमारे ८० संस्था थेट पाणी घेतात.

पुणे  - दुष्काळी परिस्थितीमुळे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून पुणे महापालिकेच्या पाणी वापरावर टाच आणली जात आहे. मात्र, केवळ पालिकाच नाही तर जलसंपदा विभागाकडे बिगर सिंचन ग्राहक म्हणून सुमारे ८० संस्था थेट पाणी घेतात. त्यात शहरातील काही नामांकित टाऊनशीपसह लष्कर भागातील संस्था व ग्रामीण भागातील नगरपालिकांचाही समावेश आहे. केवळ पालिकेच्याच पाणी वापराबाबत बोलले जाते, इतर संस्था व टाऊनशीप पाणी कमी करण्याबाबत सिंचन विभागाचे अधिकारी धाडस का दाखवत नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचे वितरण कालवा समितीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार केले जाते. परंतु, त्यात पुणे महापालिका आणि शेतीसाठी सोडल्या जाणाºया पाण्याच्या वाटपाबाबत चर्चा केली जाते. प्रत्यक्षात जलसंपदा विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदांना बिगर सिंचन ग्राहक म्हणून पाणीपुरवठा केला जातो. तसेच नांदेड सिटी, अ‍ॅमनोरा पार्क सारख्या टाऊनशीप व लष्कर भागातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद ्र(सीडब्ल्यूपीआरएस), मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस (एमईएस) सारख्या संस्थांनासुद्धा बिगर सिंचन ग्राहक म्हणून पाटबंधारे विभागाकडून पाणी पुरवठा केला जातो. पालिकेप्रमाणेच इतर सिंचन ग्राहक पाटबंधारे विभागाला नियमानुसार शुल्क देऊन पाणी घेतात. इतर बिगर सिंचन ग्राहक म्हणून जलसंपदा विभागाकडून सुमारे ८० संस्था पाणी घेतात. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून या संस्थांनीही पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. परंतु, पाटबंधारे विभागाने अद्याप एकाही संस्थेला पाणी काटकसरीने वापरण्याबाबत लेखी किंवा तोंडी सूचना दिल्या नाहीत.पाटबंधारे विभागाबरोबर काही संस्थांचे करार झालेले आहेत. करारानुसार नांदेड सिटीला वर्षाला ७.८३ दशलक्ष घन मिटर (दलघमी) पाणी मंजूर आहे. अ‍ॅमनोराला ५.७८ दलघमी पाणी मंजूर आहे.लष्कर परिसरातील नागरी वस्तीसाठी वेगळे पाणी दिले जाते. परंतु, पाटबंधारे विभागाकडून सीडब्ल्यूपीएआरएसला आणि एमईएस स्वतंत्रपणे पाणी दिले जाते. उचलल्या जाणाºया पाण्यावर लक्ष ठेवते का? असा सवाल सजग नागरिक मंचातर्फे करण्यात आला आहे.कालवा सल्लागार समितीमध्ये केवळ पालिकेच्या पाण्याचा विचार केला जातो, इतर बिगर सिंचन ग्राहक, शहर परिसरात सुरू असलेल्या बांधकामासाठी लागणाºया पाण्याबाबत विचार केला जात नाही, असा दावा सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केला. तसेच पालिकेप्रमाणे इतरांच्या पाण्यावरही नियंत्रण आणावे, अशी अपेक्षाही वेलणकर यांनी केली आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे