मागासवर्गीयांच्या कर्जमाफीचे काय?
By Admin | Updated: July 2, 2017 03:10 IST2017-07-02T03:10:31+5:302017-07-02T03:10:31+5:30
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. पण मागासवर्गीयांवर असलेल्या कर्जाचे काय? त्यांना कधी माफी मिळणार? अशा मागणीचे

मागासवर्गीयांच्या कर्जमाफीचे काय?
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. पण मागासवर्गीयांवर असलेल्या कर्जाचे काय? त्यांना कधी माफी मिळणार? अशा मागणीचे निवदेन विविध संघटनांतर्फे सामाजिक न्यायमंत्री डॉ. राजकुमार बडोले यांना देण्यात आले.
रिपाइं मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी हे निवेदन दिले. मागासवर्गीयांनी शासनाच्या विविध मंडळाकडून कर्ज घेतले आहे. हे थकित कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर मातंग व दलित संघटनांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊ. शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन राजकुमार बडोले व दिलीप कांबळे या मंत्र्यांनी दिले.
शिष्टमंडळात शहरअध्यक्ष महेंद्र कांबळे, प्रकाश वैराळ, सुखदेव अडागळे, खंडू शिंदे, रमेश खंडाळे, महेश शिंदे, सुनील जाधव, अमोल खंडाळे आदी सहभागी झाले होते.