शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेक इन इंडियाचा स्थानिकांना काय फायदा? योजना उद्योगपतींसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:31 IST

सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे.

कुरुळी - सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, सोसायटीची माजी अध्यक्ष स्वामी येळवंडे यांनी केली आहे.खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी, एसीझेड परिसर मोठया प्रमाणात वाढत चालल आहे. आंतरराष्ट्रीय उद्योगांची या परिसरात मोठी गुंतवणूकष होत आहे. मात्र, प्रकल्प उभा करण्यासाठी ज्या शेतक-यांनी जमिनी दिल्या त्यापैकी अनेक शेतक-यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. तर, दुसरीकडे भुमीपुत्रांना नोक-यांमध्ये संधीच अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. या परिसराती शेतक-यांच्या शेती ची जमीन उद्योगांसाठी सरकारने संपादित केल्या. मोबदल्यासाठी स्थानिक नेत्यांसह नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आपला विरोध सरकार पुढे मांडला.कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यात आल्या. हळूहळू उद्योगही या परिसरात उभे राहू लागले. हे सर्व करीत असताना स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी झाली. पण काही काळात बाहेरच्या राज्यातून या परिसरात कंपनीच्या उच्चपदवर अधिका-यांची भरती करण्यात आली. या अधिका-यांनी कंत्राट पद्धतीने सुरु करून परराज्यातील तरुणाना नोक-यांमध्ये समाविष्ट करून घेतले.जगाच्या नकाशावर असणा-या चाकण एमआयडीसीत प्रकल्पात मोठया झपाट्याने वाढ होत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरी पासून वंचित राहवे लागते आहे. याच उद्योगामध्ये परराज्यातील तरुणांना कंत्राटी पद्धतीने कमी मोबदलात रोजगार दिला जातो. मेक इन इंडियाच्या माध्यमातून परिसरातील मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय उद्योगांनी गुंतवणूक केली.या गावांमधील स्थानिक तरुण मात्र बेरोजगारीलाच सामोरे जात आहेत.प्रकल्पबाधित स्थानिक तरुणांना येथील कंपनीत साधा प्रवेशही मिळत नाही. तरुण पिढी शैक्षणिक पात्रता असूनही बेरोजगार बनत चालली आहे. परराज्यातील तरुणांना नोकरी देत त्यांच्या कडून काम करून घेतले जाते. त्याचा मोबदलाही योग्य पद्धतीने दिला जात नाही. शेतकरी दिवसभर शेतात काम करून मोल मजुरी करून पोटाला चिमटा घेत मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. उच्चशिक्षत तरुणांना दिवस भरत पडेल ते काम करावे लागते. वाढती महागाई पाहता कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न आता तरुणांना पुढे आ वासून उभा आहे.

टॅग्स :PuneपुणेMake In Indiaमेक इन इंडिया