इंदापूरच्या पश्चिम भागात भीषण चाराटंचाई

By Admin | Updated: April 29, 2017 03:53 IST2017-04-29T03:53:57+5:302017-04-29T03:53:57+5:30

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई जाणवत आहे.

In the western part of Indapur, the severe drought in the past | इंदापूरच्या पश्चिम भागात भीषण चाराटंचाई

इंदापूरच्या पश्चिम भागात भीषण चाराटंचाई

कुरवली : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई जाणवत आहे. शेतातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे रानातील मका, कडबा आदी पिके पूर्णपणे जळून गेली आहेत. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच स्थानिक मेंढपाळ भर उन्हात शेळ्या, मेंढ्याना फिरवूनही त्यांना पोटभर चारा मिळत नाही.
चाऱ्यासाठी, पाण्यासाठी उन्हाच्या झळा सोसत दिवसभर भटकंती करावी लागत आहे. नदीशेजारील गावांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न आहे. चाराछावणीमुळे चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी होणारे मुक्या जनावरांचे होत असलेले हाल काही प्रमाणात कमी होतील. त्यामुळे चाराछावणी सुरु करण्याची मागणी येथील शेतकरी आणि स्थानिक मेंढपाळ करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: In the western part of Indapur, the severe drought in the past