शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बिबवेवाडीत युवकावर वार करुन गुंडाचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 17:49 IST

‘‘कोणाच्या अंगात दम असेल त्यांनी पुढे या. त्यांचे तुकडे तुकडेच करतो’’, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली

ठळक मुद्दे फिर्यादी याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना लाथाबुक्यांनी मारहाण

पुणे : तळजाई परिसरात दारु पिऊन वाहनांची तोडफोड करण्याच्या प्रकारानंतर सराईत गुन्हेगारांनी बिबवेवाडीत राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर का राहतो, असा जाब विचारुन गुंडांच्या टोळक्याने युवकावर धारधार शस्त्राने वार करुन जखमी केले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तळजाई परिसरात रविवारी गुंडांनी दहशत पसरवत ५० वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार झाल्यानंतर आता बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता गुंडांनी राडा घातला.बिबवेवाडी पोलिसांनी ६ गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे.सनी जाधव, काळा गाडे, बाळ्या गाडे (तिघे रा. चैत्रबन वसाहत, अप्पर बिबवेवाडी), सनी शिंदे (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी), कुंदन शिंदे (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी), बाव्या पंधेकर (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शनी जाधव, काळा गाडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.याप्रकरणी बिबवेवाडी येथील १७ वर्षाच्या युवकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याच्या मित्राच्या वाढदिवसासाठी सोमवारी रात्री साडेआठ वाजता जात असताना अप्पर डेपो येथील शेवटचा बसस्टॉपजवळ या गुंडांनी त्याला अडविले.  ‘‘अतुल जाधव, रणजित सांवत यांच्याबरोबर तु का राहतो.थांब तुला खल्लासच करतो’’ अशी धमकी देऊन सनी शिंदे व बाव्या पंधेकर याने त्यांच्याकडील शस्त्राने फिर्यादीवर वार करुन त्याला जखमी केले. फिर्यादी याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. भर रस्त्यात सुरु असलेला हा प्रकार पाहून लोक जमा झाले. तेव्हा तेथे जमलेल्या लोकांना हत्यार दाखवून ‘‘कोणाच्या अंगात दम असेल त्यांनी पुढे या. त्यांचे तुकडे तुकडेच करतो’’, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. त्यामुळे लोकांनी पुढे येण्याचे धाडस केले नाही. गुंड पळून गेल्यानंतर फिर्यादीच्या साथीदारांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

टॅग्स :BibvewadiबिबवेवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस