विहिरी, कूपनलिका कोरड्या
By Admin | Updated: February 5, 2016 02:16 IST2016-02-05T02:16:14+5:302016-02-05T02:16:14+5:30
तालुक्याच्या जिरायती भागामध्ये उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.

विहिरी, कूपनलिका कोरड्या
वासुंदे : तालुक्याच्या जिरायती भागामध्ये उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. परिणामी, या भागात पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाल्याने पाणी मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून बोअरवेलला वाढती मागणी असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी हे आपल्या घराजवळ अथवा शेतामध्ये नवीन बोअरवेल घेऊन पाण्याची सोय करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, जमिनीतील पाणीपातळी खोलवर गेल्याने पाणी लागेल की नाही, याची शाश्वती नसतानाही शेतकरी आर्थिक तोटा सहन करून आपले नशीब अजमावत आहेत. एकूणच या भागात पाण्यासाठी बोअरवेलला मात्र वाढती मागणी आहे.