शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'खंडू'ने केलं 'अलर्ट' म्हणून सर्पदंशाचा धोका टळला; विद्यार्थ्यांचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 18:07 IST

'डेरिंगबाज' खंडूमुळे आजपर्यंत दोनदा सर्पदंशाचा धोका टळला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'तो' सर्वच विद्यार्थ्यांचा लाडका आहे. दरवर्षी विद्यार्थी न चुकता त्याचा वाढदिवस देखील साजरा करतात. आणि का करून नये.. कारण तो ही तितकाच 'डेरिंगबाज' आहे. आजपर्यंत दोनदा त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्पदंशापासून एकदा सुरक्षा रक्षकांचे आणि दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले आहे. दुसरी घटना तर अगदी आजचीच आहे. ही गोष्ट आहे विद्यापीठातल्या खंडू नावाच्या कुत्र्याची..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सोमवारी (दि.२४ ) काही विद्यार्थी एकत्र चर्चा करत बसले होते. त्याचवेळी तिथे खंडू नावाचे कुत्रे अचानक जोरजोरात भुंकू लागले. तरीदेखील विद्यार्थ्यांचं त्याकडे लक्ष नव्हते. मात्र, कुत्र्याचे भुंकणे थांबत नाहीये म्हणून त्यांना काहीतरी धोका असल्याची जाणीव झाली. जागेवरून उठून त्यांनी आजूबाजूला पाहिले तर एक भला मोठा लांब साप त्यांच्या अगदी जवळ आलेला दिसला. काही क्षणात तिथून ते बाजूला झाले. कुत्र्याने भुंकणे चालूच ठेवल्याने नंतर सापाने आपला मार्ग बदलला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लगेच सर्पमित्रांना बोलावले. काही वेळातच सर्पमित्रांनी या सापाला ताब्यात घेतले. 'खंडू'ने अलर्ट केल्यामुळे सर्पदंशाचा धोका टळला. अगदी काही क्षणांचाही विलंब किती महागात पडला असता याची कल्पना विद्यार्थ्यांना झाली.

कुत्रा आणि माणूस यांच्यातलं नातंच पहिल्यापासूनच खास राहिलेलं आहे. कुत्र्याने वेळोवेळी आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याचे अनेक उदाहरणे अवतीभोवती पाहायला मिळतात.याचाच अनुभव पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आला. 

 काही महिन्यांपूर्वी असेच विद्यापीठ परिसरात काही सुरक्षा रक्षक एकत्र जेवण करत बसले होते. जेवताना गप्पात रंगलेल्या सुरक्षा रक्षकांना पुढील धोक्याची कल्पना देखील नव्हती. पण तिथेच असलेल्या खडूं या कुत्र्याने हा धोका ओळखला होता. साप जवळ अगदी काही फुटावर येऊन ठेपला होता. सुरक्षा रक्षकाच्या हाताला दंश करणार एवढ्यात खंडू कुत्र्याने सापावर झडप घालण्यासाठी उडी मारली पण ती सुरक्षा रक्षकाच्या अंगावर पडली. त्यामुळे खडबडून उठलेल्या सेक्युरिटी गार्डला जवळच साप असल्याचे दिसले. नंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडले होते. 

याबाबत अविनाश शेंबेटवाड म्हणाला, लॉकडाऊन काळात विद्यापीठात विद्यार्थ्यांची गर्दी कमी आहे. शैक्षणिक कामकाज देखील बंद असल्याने वर्ग देखील बंद आहेत.या कालावधीत बऱ्याचदा साप आढळतात. मात्र, खंडू नावाच्या कुत्र्याने दोन वेळा आपला जीव धोक्यात घालून सर्पदंशापासून विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांना वाचविले आहे. खंडू विद्यापीठात सर्वांचा लाडका आहे. त्याच्यावर सर्व विद्यार्थी भरभरून प्रेम करतात.दरवर्षी न चुकता त्याचा वाढदिवस देखील साजरा  करण्यात येतो.

टॅग्स :Puneपुणेsnakeसापdogकुत्राPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी