शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 20:05 IST

दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण

उंडवडी : पंढरीच्या वाटेवरील जगदगुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी (दि.२७) रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास  बारामती तालुक्यात प्रवेश केला. सकाळी प्रस्थान ठेवलेल्या सोहळ्याने वरवंड ते उंडवडी सुपे २५ किलोमीटरचा सर्वात लांबचा पल्ला पार केला. तालुक्याच्या शिवेवर गुंजखिळा येथे फुलांची उधळण करत गळाभेट घेत दोन वर्षांनंतर सोहळ्यातील वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह, आनंदाचे वातावरण आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्याच्या सोबतीला आसंमंतात घुमणारा टाळ - मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, टाळ- मृदुंगाचा गजर करत चिपळ्याच्या तालावर, कपाळी गंध, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मुखाने हरिनाम अशा या वातावरणाने मंत्रमुग्ध झालेल्या लाखो वारकऱ्यांसह तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि.२७) रोजी सायंकाळी  बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी उंडवडी सुपे ग्रामपंचायत हद्दीतील येथील पालखी तळावर विसाव्यासाठी आगमन झाले. यावेळी  दर्शनाखाठी आलेल्या शेतकºयांनी पाऊस पडण्यासाठी तुकोबांना साकडे घातले.

गुंजखिळा येथील स्वागत आटोपून पालखी सोहळा उंडवडी सुपे येथे सायंकाळी ७.४० ला मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाला. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. मंगळवारी (दि २८) सकाळी ७ वाजता पालखी सोहळ्याचे बारामती शहराकडे प्रस्थान होणार आहे.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखी