संत योगीराज महाराज पालखीचे स्वागत

By Admin | Updated: July 19, 2015 03:44 IST2015-07-19T03:44:08+5:302015-07-19T03:44:08+5:30

येथे संत योगीराजबाबा महाराजांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Welcome to Sant Yogiraj Maharaj Palkhi | संत योगीराज महाराज पालखीचे स्वागत

संत योगीराज महाराज पालखीचे स्वागत

काऱ्हाटी : येथे संत योगीराजबाबा महाराजांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पानसरेवाडी येथे मुक्कामी असलेल्या पालखीने काऱ्हाटीकडे प्रस्थान केले. पालखी सकाळी आठ वाजता गावात पोहोचली. तेव्हा ग्रामस्थांनी ढोल- लेझीमच्या निनादात शालेय विद्यार्थ्यांनी पालखीचे स्वागत केले. त्यावेळी परिसरातील हजारो महिला व पुरुषांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. ग्रामस्थांच्या वतीने चहा नाश्त्याची सोय केली होती.
या वेळी सरपंच, उपसरपंच आदींनी दिंडीतीतील भाविकांची आरोग्याबद्दल विचारपूस केली. मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. गणेशनगर येथे योगीराज महाराजांच्या पादुकांना दही, दुधाने अभिषेक घालण्यात आला. नंतर पालखी सोहळा जळगाव सुपेच्या दिशेने मार्गस्थ झाला. (वार्ताहर)

Web Title: Welcome to Sant Yogiraj Maharaj Palkhi