स्वागताने कॅनडाचे पाहुणे भारावले
By Admin | Updated: January 20, 2015 23:44 IST2015-01-20T23:44:00+5:302015-01-20T23:44:00+5:30
कॅनडातील पाहुणे आणि स्वागताला मराठमोळा साज! भारावून गेले. पेरणेगाव आणि आबालवृद्धांनी केली गर्दी. आगळावेगळा सुवर्णदिवस आज.

स्वागताने कॅनडाचे पाहुणे भारावले
लोणी कंद : कॅनडातील पाहुणे आणि स्वागताला मराठमोळा साज! भारावून गेले. पेरणेगाव आणि आबालवृद्धांनी केली गर्दी. आगळावेगळा सुवर्णदिवस आज.
पेरणेगाव (ता. हवेली) येथे रोटरी क्लब आॅफ पुणे कॅन्टोंमेंट व
स्लिपिंग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड (कॅनडा) यांच्या विद्यमाने ८०० विद्यार्थ्यांना चटईपासून दप्तरपर्यंत शालेय वस्तूंचे किटवाटप
करण्यात आले. यासाठी समीर रुपानी, खुजेम, राजेश जैन, रुपानी
अकपा, मारी रेड्डी, सुजाता आपटे हे कॅनडातील पाहुणे पेरणे गावात
आले होते.
गावचा परिसर स्वच्छ करुन घरांपुढे रांगोळी घालण्यात आली होती. ढोल लेझीम ठेका, मराठमोळे फेटे आणि पाहुण्यांसाठी खास सजवलेली बैलगाडी. या आगळ्यावेगळ्या स्वागताने पाहुणेही भारावून गेले.
प्रथम भारतीय नंतर कॅनडाच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. सतरंजी, गादी, उशी, ब्लँकेट,
शाळेचे ड्रेस, नाईट ड्रेस, स्वेटर, कानटोपी, रेनकोट, बूट सॉक्स, ड्रॉर्इंगवही, रंगपेटी, नोटबुक,
पाण्याची बाटली अशा ३५ वस्तूंचे किट या वेळी देण्यात आले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पंचायत समिती सभापती वसुंधरा उबाळे, संदीप भोंडवे, ज्ञानेश्वर वाळके, अशोक खांदवे, सुभाष जगताप, आत्माराम वाळके, सरपंच सुनीता लोंढे, उपसरपंच राजेंद्र वाघमारे, दत्तात्रय वाळके, नीलेश वाळके, रवींद्र वाळके, संदीप कोहिनकर, मीना शेंडकर, कौस्तुभ गायकवाड, युसूफ बंगाली, पंकज आपटे, करण मार्गेन, अॅलोयसिस परेश आदींनी त्यांचे स्वागत केले. पेरणेगाव परिसरातील
शाळांना लवकरच संगणक देण्यात येतील, असेही वांजळे यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य नीलेश गव्हाणे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन झाले.
शिवाजी वाळके, संतोष वाळके यांनी स्वागत केले. वैभव पोरे यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी दरेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
‘‘पाहुण्यांनी हवेली तालुक्यातील पेरणे गावची निवड केली, हे आमचे भाग्यच आहे! विद्यार्थ्यांच्या गरजा काय? अपेक्षा काय? शिक्षणासाठी आवश्यक बाबी काय? याचा कधी पालकांनी विचार केला नसेल. परंतु पाहुण्यांनी केला आहे. त्यांना असे साहित्य आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते नेत्रदीपक कामगिरी करून दाखवतील.
- शुक्राचार्य वांजळे