एलबीटीबाबत घेणार एक आठवड्यात भूमिका
By Admin | Updated: June 18, 2014 00:44 IST2014-06-18T00:44:45+5:302014-06-18T00:44:45+5:30
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विषयी महापालिकेला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

एलबीटीबाबत घेणार एक आठवड्यात भूमिका
पुणे : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विषयी महापालिकेला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर महापालिकेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानुसार आठवडाभरात एलबीटीविषयी भूमिका जाहीर करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण यांनी दिली.
महापालिकेचा एलबीटी हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. महापालिकेची स्वायत्ता कायम राहण्याच्या दृष्टीने एलबीटी महत्त्वाचा असल्याचे महापालिका पदाधिकारी व प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याविषयीचा अभिप्राय व्यापाऱ्यांशी चर्चा करून महापालिकेने शासनाकडे पाठविला होता. मात्र, मुख्यमंत्री चव्हाण यांनी महापालिकांना योग्य निर्ण़य घेण्याचे आदेश दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास नागरिक व महापालिका कामगारांचा रोष पत्करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती आहे.
त्याविषयी चव्हाण म्हणाल्या, ‘‘महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत कमी न होता काही पर्यायी मार्गावर विचार होईल. त्याविषयी अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करून राष्ट्रवादी आपली भूमिका आठवड्यात जाहीर करील.’’(प्रतिनिधी)