भोरमध्ये आधारला मोबाईल लिंकिंगचा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:16 IST2021-09-09T04:16:13+5:302021-09-09T04:16:13+5:30

ग्रामीण डाक पश्चिम विभागाचे अधीक्षक पी. ई. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक संजय भंडारी यांनी व प्रफुल्ल सुतार, ...

Week of Aadhaar Mobile Linking at dawn | भोरमध्ये आधारला मोबाईल लिंकिंगचा सप्ताह

भोरमध्ये आधारला मोबाईल लिंकिंगचा सप्ताह

ग्रामीण डाक पश्चिम विभागाचे अधीक्षक पी. ई. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक संजय भंडारी यांनी व प्रफुल्ल सुतार, विलास जेधे यांनी भोर तालुक्यातील ग्रामीण डाक सेवकांच्या मदतीने ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या सप्ताहात आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे यांचे आयोजन केले आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी माहिती भोर पोस्ट ऑफिसच्या वतीने देण्यात आली. या कामी भोर तालुक्यातील ५० डाकसेवकांची मदत घेतली आहे.

दोन दिवसांत साधारण आधारचे ४०० अपडेशन झाले आहे.

भोर तालुक्यातील नागरिकांना आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना बँकेच्या कामात व इतर कामात अडचणी निर्माण होतात, यामुळे त्यांना इतरत्र हेलपाटे मारावे लागतात, याकरिता पोस्ट ऑफिसच्या वतीने आधार कार्डला मोबाईल लिंक सप्ताह चालू आहे. यामध्ये कमी शुल्कात लिंक करून मिळत आहे. याचा फायदा नागरिकांनी घ्यावा. दोन दिवसांत साधारण ४०० आधार अपडेशन झाले आहेत. असे भोरचे पोस्ट मास्तर शिवराज तेलंगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.

--

फोटो क्रमांक : ०८महुडे आधार कार्ड लिंक करणे

फोटो - आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करताना भोर पोस्टातील डाकसेवक

Web Title: Week of Aadhaar Mobile Linking at dawn