बुधवारी ३३१ कोरोनाबाधित : २७७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:28+5:302021-07-15T04:09:28+5:30
पुणे : शहरात बुधवारी ३३१ कोरोनाबाधित आढळून आले असून, २७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...

बुधवारी ३३१ कोरोनाबाधित : २७७ कोरोनामुक्त
पुणे : शहरात बुधवारी ३३१ कोरोनाबाधित आढळून आले असून, २७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ९९ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.०८ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही २ हजार ९१७ असून, दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ७ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २२७ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ५१८ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २७ लाख ५४ हजार ९७६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यापैकी ४ लाख ८२ हजार ५८२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७० हजार ९९७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------
पुण्यातील कोरोनास्थिती
बुधवारी बाधित - ३३१
आज घरी सोडले - २७७
एकूण बाधित रुग्ण - ४,८२,५८२
सक्रिय रुग्ण - २,९१७
आजचे मृत्यू - १२
एकूण मृत्यू - ८,६६८