शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड पोलिसांची ' वेबसाईट लाँच ' : मोबाइल, टॅब, आयपॅडवरूनही करता येणार व्हिजीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:13 IST

सिटीझन अलर्ट वॉलवर पोलिसांनी दिलेली माहिती नागरिक देखील पाहू शकणार

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचणार संकेतस्थळ इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये तयार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) बुधवारी (दि. १८) लोकार्पण करण्यात आले. पोलीस आयुक्त  संदीप बिष्णोई यांच्या हस्ते वेबसाईटचे लॉंचिंग झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या वेबसाईटला मोबाइल, टॅब, आयपॅडवरूनही '' व्हिजीट'' करता येणार आहे. त्यामुळे या वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत.संकेतस्थळ इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये तयार करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांना ई-तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सिटीझन अलर्ट वॉलवर पोलिसांनी दिलेली माहिती नागरिक देखील पाहू शकणार आहेत. संकेतस्थळावर माहितीचा अधिकार, पोलीस भरती विषयक माहिती, पोलीस विभागाचे विविध उपक्रम, सुरक्षेबाबत दक्षता, शहरातील वाहतूक विषयक माहिती नागरिकांसाठी उपलब्ध आहे. नव्या संकेतस्थळावर पिंपरी- चिंचवड पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध पोलीस शाखा व पोलीस ठाण्यांचे अधिकारी यांचे संपर्क क्रमांक तसेच नागरिकांना नजिकच्या पोलीस ठाण्यांची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकणार आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडील मदतीकरिता विविध हेल्प लाइनची माहिती देण्यात आली आहे.अंध व्यक्तींना देखील स्क्रीन रिडर सॉफ्टवेअरच्या सहाय्याने हे संकेतस्थळ वापरणे सुलभ आहे. लॉस्ट अँड फाउंड (हरविले - सापडले) या टॅबवरून नागरिकांना अति महत्त्वाची वस्तू हरवल्याची व सापडल्याची माहिती पोलिसांना तात्काळ घरबसल्या देता येणार आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना भाडेकरूंची माहिती, हरविलेल्या व्यक्तींबाबत माहिती, चोरीस गेलेली व बेवारस वाहने, अनोळखी मृतदेह, पोलीस पडताळणी सेवा इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध प्रकारचे परवान्यांसाठीचे विहित नमुन्यातील अर्जदेखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग असल्याने, तसेच सर्व नागरिक मोबाईल व इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने, त्यांना त्याव्दारे पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या संकेतस्थळावर आवश्यक अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विकसित केलेले संकेतस्थळ निश्चितच उपयोगी ठरणार असल्याने, नागरिकांनी पोलीस कामकाजासाठी सदर संकेतस्थळाचा वापर करावा.- संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस