शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस

By नम्रता फडणीस | Updated: October 18, 2024 11:05 IST

मोबाईल ही तरुणपिढीसाठी चोवीस तासांची गरज बनली आहे. ‘ग्रींडर’ हे एलजीबीटीक्यू समुदायाचे एक मोफत डेटिंग ॲप आहे.

पुणे : नवीन मित्र मैत्रिणी किंवा जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲपचा वापर करत असाल तर सावधान! कारण तुमची फसवणूक होऊ शकते. सध्या समलैंगिक, उभयलिंगी, तृतीयपंथी यांसाठीच्या ‘ग्रींडर’ ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. ‘ग्रींडर’ ॲप हा एकप्रकारे हनी ट्रॅपचाच प्रकार असून, याद्वारे पुण्यासह नागपूर आणि दिल्लीमधील अनेकांना गंडा घालण्यात आल्याचे तक्रारी आल्याने सायबर क्राईमच्या रडावर हे ॲप आले आहे.

मोबाईल ही तरुणपिढीसाठी चोवीस तासांची गरज बनली आहे. ‘ग्रींडर’ हे एलजीबीटीक्यू समुदायाचे एक मोफत डेटिंग ॲप आहे.

अशी होते फसवणूक‘ग्रींडर’ या ॲपद्वावरे तरुण-तरुणीशी ओळख निर्माण केली जाते. सुरुवातीला त्यांच्याशी छान संवाद साधत एक मैत्रीपूर्ण नाते तयार केले जाते. त्यानंतर काही दिवसात त्या व्यक्तीला एका अज्ञातस्थळी डेटवर बोलावले जाते.

ती व्यक्ती तिथे आल्यावर तिचे अपहरण करून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात किंवा शरीरसंबधांच्या बहाण्याने या व्यक्तींचे छुपे व्हिडिओ काढले जातात. त्यानंतर याच व्हिडिओच्या आधारे त्यांना धमकावून किंवा मारहाण करून लुटले जाते.

पुण्यातही तरुणाचे अपहरण करून लुटले- ग्रींडर डेटिंग ॲपद्वारे ओळख वाढवून तरुणाला भेटण्यासाठी बोलावून त्याचे अपहरण करून लुटणाऱ्यांचा पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. - यापूर्वीही नागपूरमध्ये या ॲपवरून संपर्क साधत एका तरुणावर घातक हल्ला करत त्याला लुटण्याचा प्रयत्न झाला होता.- या हल्ल्यात २१ वर्षीय तरुण थोडक्यात बचावला होता. दिल्लीतही १५० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती सायबर क्राईमच्या सूत्रांनी दिली.

ग्रींडर डेटिंग ॲप अगर इतर कोणत्याही ॲपद्वारे संपर्कात येऊन कोणत्याही नागरिकांना लुटण्यात आले असल्यास अगर ब्लँकमेल केले जात असल्यास त्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा- पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

धोक्याची घंटामित्र-मैत्रिणी आणि जोडीदार शोधण्यासाठी विविध चॅटिंग आणि डेटिंग ॲपचा वापर करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. मात्र, हीच तरुणाईसाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे. सायबर चोरट्यांनी या डेटिंग ॲपला लक्ष्य  केले आहे. 

ॲप ही लोकांशी जोडण्यासाठीची एक मोडस ऑपरेंडी आहे. आज ग्रींडरसारखे अनेक ॲप उपलब्ध आहेत. एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा फोटो लावायचा. त्यांना समोरच्या व्यक्तीशी चॅट करायला लावले जाते. त्यानंतर डेटिंगसाठी बोलावले जाते. काहीवेळा आर्थिक देवाणघेवाण होते. मात्र, कुणी एकांतात भेटायला बोलावत असेल तर सार्वजनिक ठिकाणी भेटण्याचा आग्रह धरला पाहिजे.  कित्येकदा इंटरनेट वर जे दिसते ते तसे असतेच असे नाही. डेटिंग ॲपवर चॅटिंग करताना संबधित व्यक्ती म्युच्युअल फ्रेंड लिस्टमध्ये आहे का ते पाहावे. कुणालाही मोबाईल क्रमांक, कुटुंबाचे फोटो  वैयक्तिक फोटो शेअर करू नयेत- ॲड. गौरव जाचक,  वकील 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस