शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

Weather Update : राज्यात सर्वदूर पावसाचं जोरदार 'कमबॅक'; पुणे, रत्नागिरीसह या जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 20:42 IST

हर्णे, राजापूर, गगनबावडा, महाबळेश्वर येथे अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्वदूर पाऊस

पुणे : गेले काही दिवस पावसाकडे डोळे लावून बसलेल्या मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बुधवारी सायंकाळपासून पावसाची जोरदार सुरुवात झाली असून हर्णे, राजापूर, गगनबावडा, कोयना, महाबळेश्वर येथे अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यातही बर्‍याच ठिकाणी पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शुक्रवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी गेल्या २४ तासात हर्णे, राजापूर २००, चिपळूण १७०, वैभववाडी १६०, कणकवली, खेड, वाल्पोई १५०, कुडाळ, लांजा, मुळदे, पेडणे १३०, संगमेश्वर, देवरुख ११०, माणगाव, मुंबई, मुरुड, श्रीवर्धन १००, देवगड, म्हापसा, फोंडा, सांगे, सावंतवाडी, वेंगुर्ला येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे.

मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा २८०, महाबळेश्वर २१०, आजारा १८०, राधानगरी १७०, चांदगड १६०, गडहिंग्लज, कराड, कोल्हापूर, सांगली ९०, शाहुवाडी, यावल ७०, वेल्हे ६० मिमी पाऊस झाला.मराठवाड्यातील सोयेगाव ६०, औंधा नागनाथ, भूम, कळंब, मुदखेड, शिरुर कासार, सोनपेठ, वाशी ३० मिमी पाऊस पडला. 

विदर्भातील अकोला ४०, चिखली३० मिमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) २३०, डुंगरवाडी, ताम्हिणी ११०, धारावी १००, दावडी ८०, कोयना (नवजा), खंद, भिवपूरी, भिरा ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र बर्‍याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे १२, लोहगाव ८, कोल्हापूर ४, महाबळेश्वर ६६, सांगली १२, सातारा ५०, मुंबई १६, सांताक्रूझ ५८, अलिबाग ५, रत्नागिरी २०, पणजी ६, डहाणु ८५, परभणी १४, अमरावती २ आणि नागपूर येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

शुक्रवारी १८ जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या तीनही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवान वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहरातही धुवाधार पावसाची बॅटिंग

शहरातील धनकवडी, सिह्गड रास्ता, धायरी, कात्रज, डेक्कन, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, वानवडी,वडगावशेरी, विमाननगर, येरवडा, वारजे माळवाडी हडपसर, पाषाण, बाणेर, यांसह विविध ठिकाणी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावली, दोन दिवसांच्या ब्रेकनंतर उपनगरांमधील विविध भागात पावसाचं दमदार कमबॅक पाहावयास मिळाले.

 

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र