विकासकामांवर भार वेतनाचा..!
By Admin | Updated: January 16, 2015 03:18 IST2015-01-16T03:18:17+5:302015-01-16T03:18:17+5:30
पुणे महापालिकेवर विकास कामांपेक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाच भार अधिक पडत आहे. सन २०१४-१५ च्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत २०१५-१६च्या अंदाजपत्रकात

विकासकामांवर भार वेतनाचा..!
पुणे : पुणे महापालिकेवर विकास कामांपेक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाच भार अधिक पडत आहे. सन २०१४-१५ च्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत २०१५-१६च्या अंदाजपत्रकात शहरातील भांडवली कामांना ५०० कोटींची कात्री लावण्यात आली आहे तर सहावा वेतन आयोग, शासकीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते, वेतनवाढ यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार ८२४ कोटींवरून तब्बल १२४३ कोटींवर पोहोचले आहेत.
सध्या शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात पोहचली आहे. या लोकसंख्येला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे दरवर्षी पालिकेस विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २०१४-१५ मध्ये हा खर्च सुमारे २०५० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे.
विकासाची नैसर्गिक गती १० टक्के गृहीत धरली तरी पुढील वर्षात तो सुमारे २२०० कोटी असणे अपेक्षित होता, पण प्रत्यक्षात महापालिका आयुक्तांनी नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकात हा भांडवली खर्च १५५० कोटी रुपयेच धरण्यात आला आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसणार आहे. (प्रतिनिधी)