शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 18:44 IST

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा इशारा

ठळक मुद्देपालकमंत्री यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना पिपल्स रिपब्लीकन पार्टी कदापी खपवून घेणार

बाभुळगाव: उजणी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी मंजुरी मिळाल्याचे जाहीर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील काही भाजपच्या दलालांनी गाव गुंडाना पुढे करून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदनाम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच भरणे यांच्या कामकाजाविषयी रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप करून टीका करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु इथुन पुढे दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करणार्‍यांना जशास तसे उत्तर देणार.  असा इशारा पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिला आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ इंदापूर तालुक्यातील सुगावमध्ये उजणी जल पात्रात पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी संजय सोनवणे बोलत होते.

सोलापूर जिल्ह्यातील काही तथाकथीत बाजारबुनगे हे चिरीमीरीसाठी दलालीचे काम करून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर बिनबुडाची टीका करत आहेत. उजणीच्या पाच टीएमसी पाण्याचा मुद्दा पुढे करून भरणे यांच्या बदनामीसाठी जिल्ह्यात अपप्रचार सुरू आहे. आंदोलने करून चर्चेत राहण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन पालकमंत्री यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना पिपल्स रिपब्लीकन पार्टी कदापी खपवून घेणार नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरSolapurसोलापूरBaramatiबारामती