शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पठाण चित्रपटातील 'बेशरम' शब्द काढला नाही तर आम्ही देखील आंदोलन करू; रामदास आठवलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 18:06 IST

भगवा रंग जसा भाजप, शिवसेनेचा आहे, तसाच तो आमचा पण रंग आहे.

पुणे : अभिनेता शाहरुख खानचा आगामी पठाण सिनेमाला आमचा विरोध नाही. गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. भगवा रंग जसा भाजप, शिवसेनेचा आहे, तसाच तो आमचा पण रंग आहे. मात्र गाण्यातील बेशरम शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम नसतो. बेशरम शब्द काढला नाही तर आम्ही देखील आंदोलन करू, असा इशारा  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

पठाण या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. मात्र हे गाणं सुरुवातीपासूनच वादात सापडले असून या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. त्यामुळे वाद झाला असून गाण्याला विरोध होत आहे. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिकीनीला नव्हे तर गाण्यातील बेशरम शब्दावर आक्षेप घेतला आहे.

यावेळी आठवले यांनी भीमा-कोरेगाव येथील कार्यक्रमासंदर्भातही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, १ जानेवारीला भीमा कोरेगाव मध्ये लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी येतात. दलितांच्या, महाराजांच्या शौऱ्याची आठवण तिथे आहे. स्तंभाजवळ सभा घेता येणार नाही असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आमचा या निर्णयाला विरोध नाही. ज्यांना सभा घ्यायची ते आजुबाजूला घेऊ शकतात. याची परवानगी देण्यात यावी याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं आठवले म्हणाले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेवर आठवले म्हणाले की, चंद्रकांत पाटील राज्यातील सिनियर नेते आहेत. मात्र त्यांच्या वक्तव्याशी कोणीही सहमत नाहीय. त्यांनी भीक हा शब्दप्रयोग केला, त्यामुळे लोकांमध्ये रोष आहे. मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो की ३०७ मागे घ्या. आता ते मागे घेतले आहेत. हा विषय लांबावणे योग्य नाही. सर्वांनी शांती ठेवणे आवश्यक आहे, असंही आठवले यांनी म्हटलं.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेcinemaसिनेमाPoliticsराजकारण