‘आमचा नील्या आम्हाला परत हवा आहे’

By Admin | Updated: May 9, 2017 03:33 IST2017-05-09T03:33:37+5:302017-05-09T03:33:37+5:30

लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटत असताना त्याचा गंभीर अपघात झाला. मेंदूला जबरदस्त मार लागला. त्यामुळे आठ दिवसांपासून

'We want to get our nails back' | ‘आमचा नील्या आम्हाला परत हवा आहे’

‘आमचा नील्या आम्हाला परत हवा आहे’

रविकिरण सासवडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटत असताना त्याचा गंभीर अपघात झाला. मेंदूला जबरदस्त मार लागला. त्यामुळे आठ दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देतोय. वडील आणि भाऊ मजुरी करीत असल्याने त्याच्या उपचारासाठी पैसे कोठून आणायचे? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. परंतु आपल्या जीवाभावाच्या दोस्तासाठी त्याच्या मित्रांनी सोशल मीडियामधून ‘एक हात मदतीचा’ ही मोहीम उघडली. त्या माध्यमातून प्रत्येक जण आपापल्या परीने आर्थिक मदत करीत आहे. मात्र उपचाराचा खर्च मोठा असल्याने या मित्रांनीदेखील आता मदतीचे आवाहन केले आहे.
कळंबोली (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेला नीलेश शामराव खरात व प्रणय गावंड हे दोघे जण, गावंड याच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी गेले होते.
रांजणगाव गणपतीवरून माघारी पुण्याच्या दिशेने येत असताना वाघोलीनजीक या दोघांचा पुणे-अहमदनगर महामार्गावर २९ एप्रिलला गंभीर अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता, की प्रणय गावंड याचा जागीच मृत्यू झाला, तर नीलेश खरात याच्या मेंदू, मणका, आतडे तसेच उजवा पाय व हातास गंभीर दुखापती झाल्या. अपघात झाल्या दिवसापासून नीलेशची शुद्ध हरपली आहे. त्याच्या अपघाताची बातमी समजताच वालचंदनगर, कळंब परिसरातील त्याच्या वर्गमित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. नीलेशवर सुरुवातीला झालेल्या उपचाराचा सर्व खर्च योगेश ढगे यांनी केला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही जिद्दीने ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण पूर्ण केलेल्या या दोस्तासाठी होता-होईल तेवढी मदत करण्याचा निर्णय प्रत्येकाने घेतला. त्यासाठी विकास कुंभार, कुलदीप सूर्यवंशी, मेघनाथ आवटे यांनी पुढाकार घेतला. व्हॉट्सअ‍ॅपवर ‘एक हात मदतीचा’ या नावाचा ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून कळंब महाविद्यालयातील सगळ््या वर्गमित्रांना जोडून घेतले. नीलेशच्या प्रकृतीची आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना देण्यात आली. त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली. सध्या ८० ते ९० हजारांच्या आसपास मदत गोळा झाली आहे. मात्र नीलेश अद्यापही शुद्धीवर आला नाही. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
सुरुवातीला कात्रज येथील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले होते. तेथील उपचाराचा खर्च मोठा होता. तीन ते चार दिवसांतच ९२ हजार बिल झाले. ही सर्व बिलाची रक्कम मित्रांनी गोळा केलेल्या मदतीतून भरली गेली. सध्या नीलेशला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 'We want to get our nails back'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.