पुण्याची लोकसभेची जागा आमचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:53 AM2018-05-26T03:53:47+5:302018-05-26T03:53:47+5:30

काँग्रेसचा दावा : जिंकून आणण्याची घेतली शपथ

We place the Lok Sabha seat in Pune | पुण्याची लोकसभेची जागा आमचीच

पुण्याची लोकसभेची जागा आमचीच

Next

पुणे : कोणी कितीही हक्क सांगत असले तरी लोकसभेची पुण्याची जागा ही काँग्रेसचीच परंपरागत जागा आहे. त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्नच नाही, उलट ती जिंकून आणण्याची शपथ पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकजुटीने घेतली आहे, असे शुक्रवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठासून सांगितले.
केंद्रातील मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. २८) काढण्यात येणाºया मूकमोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकारांच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर केलेल्या दाव्याची त्यांचे नाव न घेता खिल्ली उडवली. आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, पक्षाच्या प्रदेश समितीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या अखिल भारतीय सरचिटणीस कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, संगीता तिवारी, नीता रजपूत, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, कामगार संघटनेचे सुनील शिंदे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, पक्षाच्या ओबीसी आघाडीचे अध्यक्ष सुनील पंडित आदी यावेळी उपस्थित होते.
लोकसभेचा पुणे मतदार संघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. तो आम्ही घटक पक्षाला देऊ शकत नाही. आमच्याकडे सक्षम उमेदवारांची वाणवा नाही. पक्ष देईल तो उमेदवार मान्य करू. गटबाजीचा काय त्रास होतो, त्याचा अनुभव पक्षाला आता आला आहे. त्यामुळेच गटबाजी विसरून हा मतदारसंघ परत काबीज करायचाच, अशी शपथच नेते मंडळींनी एकत्रितपणे घेतली आहे, असे शिवरकर म्हणाले.
मोहन जोशी यांनी यावेळी भाजपाला धार्मिक दंगे घडवून आणण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही व येतही नाही, अशी टीका केली. मूकमोर्चा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होईल व स्वारगेट येथील केशवराव जेधे पुतळ्याजवळ विसर्जित होईल, अशी माहिती यावेळी बागवे, छाजेड, जोशी यांनी दिली.

Web Title: We place the Lok Sabha seat in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे