जीवनात आपल्यातील कला-गुणांना वाव देणे गरजेचे : मोहिते - पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:13+5:302021-02-21T04:20:13+5:30
आळंदीतील श्री. नरसिंह सरस्वती मेडिकल फाऊंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते. ...

जीवनात आपल्यातील कला-गुणांना वाव देणे गरजेचे : मोहिते - पाटील
आळंदीतील श्री. नरसिंह सरस्वती मेडिकल फाऊंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, डॉ. संजय देशमुख, अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार, डॉ. मुकुल देशपांडे, डाॅ. अनिल पत्की, डॉ. नितीन गोसावी, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे, माजी उपसरपंच अमोल विरकर, वासुदेव मुंगसे, पार्श्वगायक अवधुत गांधी, उद्योजक सुरेश झोंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, वार्षिक स्नेहसंमेलनाला आमदार महेश लांडगे, सिनेअभिनेत्री ऐश्वर्या काळे,आमदार राहुल कुल यांनी भेट दिली.
अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात आरोग्य सेवा करत असताना येथील डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा करण्यासाठी पाठबळ मिळावे यासाठी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामधून सर्वांना प्रेरणा मिळत आहे. दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलनात आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक डॉ. संजय देशमुख यांनी सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले.
स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करताना आमदार दिलीप मोहिते - पाटील.