शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा जीव घेणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 19:27 IST

रिंग रोड व पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला बाधित शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

ठळक मुद्देप्रस्तावित रिंग रोडची आखणी बदलून ती शासकीय गायरान व वन विभागाच्या जमिनीतून विकसित करण्याची शेतकऱ्यांची मागणी

आळंदी: आळंदीसहीत आजूबाजूच्या गावांमध्ये रिंग रोड व पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे संदर्भात दोन दिवसांपासून प्रशासकीय बैठका सुरू आहेत. मात्र बहुतांशी सर्वच बैठकांमध्ये दोन्ही प्रस्तावित प्रकल्पांना बाधित शेतकऱ्यांकडून कडाडून विरोधाचा सूर उमटत आहे. आळंदीत प्रस्तावित असलेल्या रिंग रोड प्रकल्पाला स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी काळ्या फीती लावून रिंग रोडच्या आखणीस व मोजणीस विरोध दर्शविला आहे. तर गोलेगाव - पिंपळगाव, मरकळ, चऱ्होली खुर्द गावातील बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे प्रकल्प आमच्या जमिनीतून आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा जीव घेणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

आळंदीत गुरुवारी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण व  संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिंग रोड बाधितांची संवाद बैठक पार पडली. मात्र या बैठकीत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी या प्रस्तावित रिंग रोडला विरोध करत पर्यायी मार्ग अवलंब करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांना काळवण्याची ग्वाही दिल्यानंतर बाधित शेतकरी शांत झाले. 

दरम्यान रिंग रोड प्रकल्पाने अनेकजण भूमिहीन होणार आहेत. शेती, घरे उध्वस्त होणार असल्याने अनेकांना जीवन जगणेही मुश्किल होणार आहे. त्यामुळे आमचे जीवन उध्वस्त करून कोणाचे ड्रीम प्रोजेक्ट उभे राहणार नाहीत. विकासाला विरोध नाही. मात्र रिंग रोड व पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे आमच्या जमिनी शिल्लक राहणार नाहीत. अशा या ड्रीम प्रोजेक्टला नेहमी आमचा विरोधच राहणार आहे. प्रस्तावित रिंग रोडची आखणी बदलून ती शासकीय गायरान व वन विभागाच्या जमिनीतून विकसित करण्याची मागणी संवाद बैठकीत करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीrailwayरेल्वेGovernmentसरकार