शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वैचारिक विरोधाचा इतिहास आपण विसरतोय  : मकरंद साठे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:31 IST

राष्ट्रवादाला विरोध नाही. मात्र , हिंसक वळण लागता कामा नये....

ठळक मुद्दे ‘युरोपीय तत्वज्ञानाच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे प्रकाशनअजून राष्ट्रवादासारख्या अन्यायाच्या चौकटींची आपल्याला जाणीवच नाही.अनुवादाच्या माध्यमातून सध्या चांगले प्रयत्न सुरू

पुणे : पूर्वी नाटकाचा विरोध नाटकाने, कादंबरीचा विरोध कादंबरीने व्हायचा. वैचारिक विरोध करण्याचा इतिहासच आपण विसरत चाललो आहोत. एखादी गोष्ट पटली नाही की मारहाण करायची ही मानसिकता बळावत आहे, हे जेएनयूमधील घटनेने स्पष्ट झाले. आपल्याभोवती राष्ट्रवादाची चौकट बळकट होत चालली आहे. ‘भारत माता की जय’ ही घोषणा देत जेएनयूमध्ये हल्ला होतो. राष्ट्रवादाला विरोध नाही. मात्र , हिंसक वळण लागता कामा नये. आपल्या जाणिवा समृद्ध नसतील, आपण सुजाण नागरिक नसू तर फसवणूक अटळ आहे, अशा शब्दांत नाटककार मकरंद साठे यांनी जेएनयूमधील हल्ल्यावर परखड शब्दांत भाष्य केले.कलासक्त, पुणे आणि केल्याने भाषांतर या त्रैमासिकातर्फे डॉ. दीप्ती गंगावणे यांनी लिहिलेल्या ‘युरोपीय तत्वज्ञानाच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे प्रकाशन मकरंद साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, कलासक्तच्या सुनंदा महाजन आणि आणि अनघा भट उपस्थित होते.साठे म्हणाले, तत्वचिंतन विरोधाचे महत्व काळाच्या ओघात संपत चालले आहे. तत्वचिंतन केले की विश्लेषण करता येते. तसेच, स्वत:ची चिकित्सा करता येते. त्यासाठी विचार करावा लागतो आणि जबाबदारी वाढते. लोकशाही म्हणवल्या जाणाºया देशात आपण राहतो. मात्र, भारत कसा आहे ते आता कळू लागले आहे. आपण कसे फसवले जातोय, हे सामान्य माणसाला कळले पाहिजे. राष्ट्रवाद या संकल्पनेने आपल्याला भुरळ घातली आहे. अन्यायाच्या चौकटी आपल्याला माहित झाल्या आहेत. मात्र, अजून राष्ट्रवादासारख्या अन्यायाच्या चौकटींची आपल्याला जाणीवच नाही.डॉ. दीप्ती गंगावणे यांनी लिखाणामागील भूमिका स्पष्ट केली. अंकिता आपटे हिने सूत्रसंचालन केले.---------------------सामान्य माणसाच्या नावाखाली एखाद्या लिखाणाचे सामान्यीकरण केले जाते. लेखक चार पावले पुढे आले तर वाचकाने दोन पावले पुढे आले पाहिजे. मला जे कळले नाही ते वाईट कसे? सामान्य माणसाला कळले पाहिजे, अशी मांडणी करण्याचा आपल्याकडे आग्रह धरला जातो. इंग्रजी वाचणारे आणि लिहिणारे यांचा कंपू साहित्यात तयार झाला असून, त्यांचेच वर्चस्व दिसते. त्यांचे वर्चस्व मोडून मराठीचे स्थान भक्कम करणे गरजेचे आहे.- मकरंद साठे--------------मराठी ज्ञानभाषा कशी होणार, हा खरा प्रश्न आहे. अनुवादाच्या माध्यमातून सध्या चांगले प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता ज्ञानाची निर्मिती आपल्या भाषेत करणे आवश्यक बनले आहे. ज्ञानिर्मितीची प्रक्रिया अखंड, अविरत सुरू राहणे आवश्यक असते. विषय शिकवणे, संधी उपलब्ध करून देणे हे विद्यापीठांचे काम आहे. एखाद्या विषयाला पुरेसे विद्यार्थी नाहीत म्हणून तो बंद करणे योग्य नाही. एखाद्या ज्ञानशाखेचा ऱ्हास होतो आणि आपल्याला काहीच वाटत नाही, ही शोकांतिका आहे. अशाने संस्कृती कशी निर्माण होणार? आधुनिक पाश्चात्य तत्वज्ञान हा आधुनिक पाश्चात्य विज्ञानाला दिलेला प्रतिसाद आहे. तत्वज्ञानाने प्रतिसाद द्यावा असे ज्ञानच आज उपलब्ध नाही.

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीliteratureसाहित्यGovernmentसरकार