wd: छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:11 IST2021-05-15T04:11:00+5:302021-05-15T04:11:00+5:30
वीर धाराऊमाता मित्र मंडळ, ग्रामस्थ कापूरहोळ जय हनुमान तरुण मंडळ, ग्रामस्थ हरिश्चंद्री ग्रामस्थ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन श्री शिवाजी ...

wd: छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
वीर धाराऊमाता मित्र मंडळ, ग्रामस्थ कापूरहोळ जय हनुमान तरुण मंडळ, ग्रामस्थ हरिश्चंद्री ग्रामस्थ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात केले होते. या शिबिराचे उद्घाटन भोरचे तहसीलदार अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोरच्या सभापती दमयंती जाधव, गट विकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, कापूरहोळचे सरपंच पंकज गाडे, माजी सरपंच किरण गाडे, विकास गाडे, योगेश गाडे, संदेश म्हस्के, राम पाचकाले, शरद म्हस्के, ग्रामसेवक राम मदने, सुनील शेलार, तलाठी सुधाकर सोनवणे, डॉ. अभिजित अहिर, पो. पा. सय्यद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्षय रक्त केंद्र यांच्या सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान महादान करून कापूरहोळ व हरिश्चंद्री ग्रामस्थ यांचेकडून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांकडून वाफेची मशिन आणि सर्व रोगावर गुणकारी असे तुळशीचे रोप भेट म्हणून देण्यात आले.