खेड तालुक्यातील समाजोपयोगी विकासकामे मार्गी: मोहिते - पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:09+5:302021-09-06T04:14:09+5:30
शेलपिंपळगाव : पुणे जिल्हा परिषदेत निर्मला पानसरेंना अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. अध्यक्ष पदाच्या माध्यमातून निर्मला पानसरेंनी खेड तालुक्यातील ...

खेड तालुक्यातील समाजोपयोगी विकासकामे मार्गी: मोहिते - पाटील
शेलपिंपळगाव : पुणे जिल्हा परिषदेत निर्मला पानसरेंना अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. अध्यक्ष पदाच्या माध्यमातून निर्मला पानसरेंनी खेड तालुक्यातील बहुतांशी गावागावांत समाजोपयोगी विकासकामे मार्गी लावली आहेत. रस्त्यांवरून प्रवास करताना पोटातील पाणी देखील हलणार नाही इतके सुसज्ज रस्ते उभारले जाणार असल्याने स्थानिक नागरिकांचे दळणवळण सुकर होणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी केले.
कोयाळी - भानोबाची (ता. खेड) येथे पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या निधीतून होऊ घातलेल्या सुमारे ७ कोटी १४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार मोहिते - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, अध्यक्ष राजाराम लोखंडे, पंचायत समिती सदस्या वैशाली गव्हाणे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सभापती बाळशेठ ठाकूर, विलास कातोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक बाळासाहेब कोळेकर, युवानेते मयुर मोहिते, कैलास लिंभोरे, माजी सरपंच संभाजी भाडळे, सरपंच गणेश कोळेकर, उपसरपंच वंदना दिघे, ग्रामपंचायत सदस्य विकास भिवरे, सतीश भाडळे, अजय टेंगले, सुनीता पांढरे, ऊर्मिला कोळेकर, अलका कोळेकर, राहुल आल्हाट, वैशाली कोळेकर, देविदास गायकवाड, आश्विनी लडकत, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, जेष्ठ विधिज्ञ सुखदेव पानसरे, माजी सरपंच संतोष गव्हाणे, माजी उपसरपंच बापूसाहेब सरवदे, विशेष कार्यकारी अधिकारी भूदेव शिंदे, ग्रामविकास अधिकारी शांताराम धेंडे, जयसिंग भोगाडे, अक्षय देशमुख आदींसह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्मला पानसरे म्हणाल्या की, जनतेच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. मात्र आमदार मोहितेंच्या नेतृत्वाखाली अध्यक्षपदावर काम करताना रस्ते, वीज, शिक्षण, पाणी, आरोग्य आदी समाजोपयोगी प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावले आहेत. एकीकडे खेड तालुक्यात होणाऱ्या असंख्य कामांमुळे नागरिक समाधानी आहेत. मात्र, विरोधकांना हे पाहवत नसल्याने त्यांची आता घालमेल होऊ लागली आहे. दरम्यान, कोयाळी गावातील शेलगाव पर्यंतचा रस्ता, अंतर्गत रस्ते, शाळा इमारती, हायमास्ट दिवे, सभामंडप, पाण्याची टाकी आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. सूत्रसंचालन दिघे महाराज यांनी तर बाळासाहेब येधुजी कोळेकर यांनी आभार मानले.
कोयाळी येथे विकासकामांचे भूमिपूजन करताना आमदार मोहिते, अध्यक्षा निर्मला पानसरे व अन्य. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)