शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे

By admin | Updated: December 31, 2014 00:07 IST

ओला व सुका कचरा वेगळा करून मिळत नसल्याने महापालिकेचे अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत, यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्व कंटेनर हलविले जाणार आहेत.

पुणे : ओला व सुका कचरा वेगळा करून मिळत नसल्याने महापालिकेचे अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत, यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्व कंटेनर हलविले जाणार आहेत. त्याऐवजी पालिकेच्या घंटागाड्यांमधून व स्वच्छच्या माध्यमातून ओला व सुका कचरा गोळा केला जाणार आहे. त्याकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील १२५० कंटेनर हलविण्याच्या दिशेने पावले उचलण्यास प्रशासनाने युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.उरुळी देवाची येथे कचरा टाकण्यास तेथील ग्रामस्थांनी ३१ डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू दिला जाणार नाही, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर शहरातला कचरा शहरातच जिरविण्याच्या दिशेने पावले उचलण्यास महापालिका प्रशासनाने सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील कंटेनर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात दररोज तब्बल सोळाशे ते अठराशे टन घनकचरा तयार होतो. मात्र, त्यातील बहुतांश कचऱ्याचे वर्गीकरण झाले नसल्याने तो बायोगॅस प्रकल्पांसाठी वापरता येत नाही. शहरामध्ये २२ बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत. मात्र, वर्गीकरण झालेला कचरा मिळत नसल्याने ते पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत. घंटागाड्या तसेच स्वच्छ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगळा जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे. या पध्दतीने कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास कचऱ्याची ५० टक्के समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी महापालिकेने एकूण १६० घंटागाड्या तैनात केल्या आहेत. विश्रामबागवाडा येथे अंमलबजावणीविश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील ४० कंटेनर हलवून त्याठिकाणी सुंदर रांगोळी सोमवारी काढण्यात होती. त्यानुसारच आता शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील कंटेनर हलविले जाणार आहेत. त्याचबरोबर कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी बकेटचे वाटप करणे, नागरिकांचे प्रबोधन करणे आदी मार्ग अवलंबले जाणार आहेत. (प्रतिनिधी)कचराप्रश्नावर अन्नधान्य व पालकमंत्री गिरीश बापट यांनी सकाळी ११ वाजता महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. उरूळी देवाची येथील नागरिकांनी ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकण्यास मनाई केल्याच्या प्रश्नावर या बैठकीमध्ये मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीत कचराप्रश्नावर काही मार्ग न निघाल्यास नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांकडून कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या अडविण्याचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.सोसायट्यांमधील कचरा सोसायट्यांमध्येच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सवलती देण्यात आल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी यापुढील काळात केली जाणार आहे. स्वच्छ संस्थेमार्फत शहरातील ४० टक्के कचरा गोळा केला जातो आहे. आणखी जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्याकडून कचरा गोळा केला जाणार आहे. घंटागाड्यांची संख्या वाढविण्यासही प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा, याकरिता त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.- दत्तात्रय धनकवडे, महापौर