शिरूर येथे वाटसरूला जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:10 IST2021-01-25T04:10:51+5:302021-01-25T04:10:51+5:30
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी आरोपी ...

शिरूर येथे वाटसरूला जबर मारहाण
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण चे
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी आरोपी राहुल दत्तात्रय गायकवाड (वय २४, रा हिंगणी दुमाला, मधला मळा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यास अटक केली आहे.
शिरुर पोलीस स्टेशनमध्ये दि. 03 रोजी तक्रार दाखल करण्यात आली असुन त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील फिर्यादी हा दि. १ जानेवारी रोजी रात्री 10:45 वा सुमारास थिटे कॉलेज शिरूर या ठिकाणाहून पायी चालत जाताना त्याला दोन अज्ञात चोरट्यांनी जबर मारहाण करून लुटले होते, त्यात फिर्यादीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम, व इतर साहित्य असा 11,900/- रु. चा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता. या गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल आरोपी राहुल गायकवाड हा वापरत असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत तपास पथकास मिळाली होती, त्या नुसार सापळा रचून जोशीवाडी शिरूर परिसरात राहुल गायकवाड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल मिळून आला आहे.