शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 15:26 IST

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

ठळक मुद्देपाण्यापासून घरातील सामान वाचवण्यासाठी स्थानिकांची धावपळ सुरु आहे

बारामती : बारामती तालुक्यातील म्हेत्रे वस्तीत शिरसाई कालव्याला जाणारी जलवाहिनी बुधवारी  सकाळी अतिदाबामुळे अचानक फुटली. पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरले आहे. जलवाहिनी फुटल्याने  लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.  येथील शेतक-यांच्या घरात आणि शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

मागील दोन दिवस या भागात पाऊस पडत आहे. शेतात पाणी असताना जलवाहिनी फुटली. यातून लाखो लिटर पाणी गळती झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पाण्यापासून घरातील सामान वाचवण्यासाठी स्थानिकांची धावपळ सुरु आहे.

शिरसाई कालवा रेल्वेलाईन येथील जलवाहिनी फुटताना मोठा आवाज झाला. त्यामुळे घबराट पसरल्याचे चित्र होते. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मुरघासाचे नुकसान झालें आहे. अनेकांच्या गोठ्यात पाणी शिरल्याचे चित्र आहे. तर काही शेतक-यांच्या शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या आहेत. काही चारचाकी वाहने पाणी शिरल्याने बंद पडली आहेत. 

या घटनेला जबाबदार कोण असा सवाल येथील स्थानिकांसह शेतकऱ्यांनी केला आहे. तर यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी असल्याचा आरोप येथील शेतकरी ,माजी सरपंच अतुल हिवरकर, आणि ग्रामस्थ यांनी केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीWaterपाणीGovernmentसरकार