शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या लिफ्टमध्ये धबधबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:12 IST

शहरामध्ये गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नवीन प्रशासकीय इमारतीच्या लिफ्टमध्ये पाण्याचा चक्क धबधबा सुरु झाला. ऐवढेच नाही तर संपूर्ण इमारतीच्या विद्युत कंट्रोल रुममध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणई गळती होत असल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे.

पुणे : शहरामध्ये गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नवीन प्रशासकीय इमारतीच्या लिफ्टमध्ये पाण्याचा चक्क धबधबा सुरु झाला. ऐवढेच नाही तर संपूर्ण इमारतीच्या विद्युत कंट्रोल रुममध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणई गळती होत असल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे. इमारतीच्या तळमजल्यावर कार पार्किंगमध्ये देखील सर्वत्र पाणी गळती होत आहे. नवीन इमारतीमधील ही गळती पाहून आयुक्त सौरभ राव यांनी डोक्याला हात लावत तातडीने संबंधित ठेकेदार व इमारतीची देखभाल करणा-या अभियंत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करुन नवीन प्रशाकीय इमारत बांधली आहे. या इमारतीचे उद्घाटन गत वर्षी २१ जून रोजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. इमारतीच्या उद्घटानाच्या दिवशीच कार्यक्रम सुरु असताना इमारतीमध्ये पाण्याची गळती सुरु झाली. या पाणी गळतीमुळे संपूर्ण देशात महापालिकेची नाचक्की झाली.  त्यानंतर काहीच दिवसांत इमारतीच्या स्लॅबचा तुकडा पडला, नवीन सभागृहात सभा सुरु असताना ठोकळा पडला, यामुळे विरोधकांसह पुणेकरांनी पत्रके काढून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपचा निषेध केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे प्रशासनाने तातडीने सीओईपीकडून संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. यामध्ये इमारतीला कोणताही धोका नसल्याचा अहवाला सीओईपीकडून देण्यात आला होता. परंतु आता बरोबर एक वर्षांनंतर गुरुवार (दि.२८) रोजी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली असून, त्यामुळे महापालिका प्रशासनाचे चांगलेच वाभाडे निघाले आहे.

गुरुवारी झालेल्या पावसामुळे इमारतीमधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गळती सुरु झाली की काही वेळातच लिफ्टला धबधब्याचे स्वरुप आले. तळमजल्यामध्ये असलेल्या इमारतीच्या विद्युत कंट्रोल रुममध्ये देखील मोठ्या प्रमाणात गळती असल्याने अखेर कर्मचा-यांनी रुम बंद करून काम थांबविले. तर तिस-या मजल्यावरील सभागृहाच्या व्हारांड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आत येत होते. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसSaurabh Raoसौरभ राव