राज्याला पाणी रडवणार

By Admin | Updated: October 5, 2014 02:15 IST2014-10-05T02:15:45+5:302014-10-05T02:15:45+5:30

गेल्या 50 वर्षाच्या सरासरी पावसाशी तुलना केली तर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात 14 टक्के पाऊस कमी झाला आहे

The water will cry to the state | राज्याला पाणी रडवणार

राज्याला पाणी रडवणार

>पुणो : गेल्या 50 वर्षाच्या सरासरी पावसाशी तुलना केली तर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात 14 टक्के पाऊस कमी झाला आहे आणि पावसाची सर्वाधिक 42 टक्के तूट मराठवाडय़ात आहे, अशी आकडेवारी भारतीय हवामान खात्याने जारी केली आहे. या आकडेवारीवरून आत्ताच उन्हाळ्यातील भीषण दिवसांचा अंदाज येत असून, यंदाही पाणी रडवणार का, असा प्रश्न बळीराजाला सतावू लागला आहे.
यंदाच्या नैर्ऋत्य मान्सूनच्या पावसाच्या प्रगतीचा शेवटचा साप्ताहिक अहवाल जारी करताना हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 14 टक्के, मध्य महाराष्ट्रात 7 टक्के तर मराठवाडय़ात सर्वाधिक म्हणजे 42 टक्के कमी पाऊस झाला आहे.
संपूर्ण भारताचा विचार केला तर महाराष्ट्राचा समावेश असलेले मध्य भारत क्षेत्र आणि दक्षिणोकडील द्विपकल्पीय प्रदेशात यंदाच्या पावसाची तूट सर्वात कमी आहे. मध्य भारतात सरासरीहून 1क् टक्के तर दक्षिण द्विपकल्पीय प्रदेशात 7 टक्के पाऊस कमी झाला आहे. अहवालानुसार जेथे 5क् वर्षाच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट 5क् टक्क्यांहून अधिक आहे त्यांत हरियाणा, चंदिगड, दिल्ली, पंजाब व उत्तर प्रदेशाचा समावेश आहे. वस्तुत: हवामान खात्याने मध्य भारतात सरासरीच्या 94 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात झालेला पाऊस याहून चार टक्क्यांनी कमी आहे. सर्वसाधारणपणो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात महाराष्ट्रातून पूर्णपणो माघार घेतो. यंदा मात्र मान्सून राज्याच्या काही भागांमध्ये ऑक्टोबरच्या दुस:या आठवडय़ार्पयत रेंगाळण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.
 

Web Title: The water will cry to the state