पांढरेवाडी ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:51 IST2016-05-11T00:51:17+5:302016-05-11T00:51:17+5:30
पांढरेवाडी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने टँकर उपलब्ध करण्यात आला आहे.

पांढरेवाडी ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्था
कुरकुंभ : पांढरेवाडी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने टँकर उपलब्ध करण्यात आला आहे. टँकरला मोफत पाणी वरवंड (ता. दौंड) येथील मारुती फरगडे यांच्या वतीने देण्यात येत आहे. दौंड ग्राहक पंचायतीच्या वतीने देखील पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे पांढरेवाडीच्या पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे.
पांढरेवाडी, जिरेगाव, कौठडी, कुरकुंभ, मळद परिसरातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पांढरेवाडी येथील नैसर्गिक स्रोत कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील दूषित पाण्यामुळे दूषित झाला आहे, तर काही ठिकाणचे जलस्रोत कायमचे आटले असल्यामुळे काही प्रमाणात शिल्लक असलेले पाणी हे दूषित असल्या कारणास्तव ग्रामस्थांना वापरता येत नाही. या वेळी उत्तम दिघे, विनायक गुळवे, प्रकाश भोंडवे,तृप्ती निंबाळकर, संतोष निंबाळकर,रफीक जाफरी, शिवाजी शितोळे, राहुल शितोळे, भिकाजी भागवत, अभिमान निंबाळकर, दीपक निंबाळकर, अशोक अग्रवाल, प्रमोद शितोळे, आदि उपस्थित होते.