पावसातही टँकरने पाणी
By Admin | Updated: August 21, 2014 23:40 IST2014-08-21T23:40:23+5:302014-08-21T23:40:23+5:30
जिल्ह्यात काही तालुक्यांत पावसाने वार्षिक सरासरी गाठत येथील पाणीटंचाई संपवली असली, तरी बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही.

पावसातही टँकरने पाणी
जिल्ह्यात काही तालुक्यांत पावसाने वार्षिक सरासरी गाठत येथील पाणीटंचाई संपवली असली, तरी बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे येथे पावसाळा संपत आला, तरी टँकर सुरू
आहेत. ...टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, सर्वाधिक 23 टँकर बारामती तालुक्यात सुरू आहेत. पुरंदरमध्येही 15 टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
बारामती तालुक्यात 9 शासकीय
व 14 खासगी टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. 12 गावांच्या आठ हजार बासष्ट इतक्या लोकसंख्येला व 157 वाड्या-वस्त्यांतील 33 हजार क्8 इतक्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सदर गावे व वाड्या वस्त्यांतील एकूण 41 हजार क्7क् लोकसंख्येला दररोज 74 खेपांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यात आतार्पयत 278.6 मिमी. पाऊस झाला असून तालुक्यात 35क् मिमीर्पयतची पावसाची सरासरी आहे. त्यामुळे अजूनही 15 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात 4 गावे व 64 वाडय़ावस्त्यांचा समावेश असून 18 हजार 802 ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवले जात आहे. यात माळशिरस, पारगाव, साकुर्डी, बेलसर, सोनोरी, पिंपरी, वाल्हे(10 वाडय़ा), राख (10 वाडय़ा), कोळविहीरे, मावडी क.प.(4 वाडय़ा) व कर्नलवाडी या गावांचा समावेश आहे.
बारामती तालुक्यात 9 शासकीय
व 14 खासगी टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. 12 गावांच्या आठ हजार बासष्ट इतक्या लोकसंख्येला व 157 वाड्या-वस्त्यांतील 33 हजार क्8 इतक्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सदर गावे व वाड्या वस्त्यांतील एकूण 41 हजार क्7क् लोकसंख्येला दररोज 74 खेपांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
इंदापूर तालुक्यात
4 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. रेडणी, अकोले (वायसेवाडी), दगडवाडी, घोरपडवाडी येथे महिनाभरापासून टँकर सुरू आहे. लामजेवाडी, खोराची, लाकडी, कळंब, शेळगाव येथे प्रतयिेकी एका टँकरने तय कळस, रणगाव, येथे दोन टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पाझर तलावात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे रूई, कळस, वायसेवाडी, रेडणी येथील टँकर बंद करणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी, डॉ. लहू वडापुरे यांनी दिली.