शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

साेमवारपासून पूर्व भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:37 IST

दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता. साेमवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे : दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता.मात्र,पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून रविवारी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे सोमवारपासून (दि.1)शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल,असा दावा पालिकेच्या पाणी-पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु, काही भागात कमीदाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने अनेकांना सलग तिस-या दिवशी पाणी मिळणार नाही,असा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

    खडकवासल्यापासून इंदापूरपर्यंत जाणारा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटल्याने खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी पूर्णपणे बंद करावे लागले. मात्र,कालव्यातून लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी वर्षभर पाणी पुरवठा केला जातो.कालवा बंद झाल्याने लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी केला जाणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला.त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ,येरवडा, कोरेगावपार्क ,विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदनगर, नगररस्ता, विमाननगर आदी भागातील पाणी पुरवठा बंद आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

   पुणेकर क्षमतेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याची टिका जलसंपदा विभागाकडून नेहमीच केली जाते.त्यात सलग दोन दिवस अनेकांच्या घरातील नळाला पाणीच आले नाही. घरात भांड्यांमध्ये व टाकीमध्ये भरून ठेवलेले पाणी दोन दिवसाच्या वापरानंतर पूर्णपणे संपले.परिणामी काही गृह निर्माण सोसायट्यांनी पाण्याचे टँकर मागवले.त्यासाठी हवी ती किंमत मोजली.तर काही नागरिकांनी कॅनॉलमध्ये साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी कॅनॉलवर गर्दी केली.खडकवासला धरण ते पर्वती जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान बंद पाईप लाईन आहे.या पाईप लाईनमधून पर्वती केंद्रात आवश्यक पाणी पुरवठा गेला जातो.कालव्यातील पाणी बंद असल्यामुळे शनिवारी लष्कर येथील जलशुध्दीकरण केंद्राला पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून कालव्यामधूनच पाणी सोडण्यात आले.

     मात्र,गणेश विसर्जनानंतर कालव्यात अडथळे निर्माण झाले आहेत.कालव्यात काही ठिकाणी घाण साचली आहे.त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून सोडलेले पाणी लष्कर जलशुध्दीकरण केंद्राकडे न जाता उलट दिशेने वाहू लागले.परिणामी ज्या ठिकाणाहून कालवा फुटला येथून पुन्हा एकदा पाणी वाहून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.परंतु,काही कालावधीतच पर्वती केंद्रातून सोडलेले पाणी बंद करण्यात आले.परंतु,रविवारी पुन्हा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

-------------------------पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून लष्कर भागासाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडले आहे.त्यामुळे सोमवारपासून पूर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल.- प्रविण गेडाम,अधिक्षक अभियंता,पाणी-पुरवठा विभाग,पुणे महापालिका  

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या