शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Pune: वडगावशेरी, लोहगावचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार सुरू

By राजू हिंगे | Updated: June 21, 2023 15:27 IST

वडगावशेरी मतदार संघातील भामा आसखेडच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये गेल्या वर्षभरात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत...

पुणे : भामा आसखेड प्रकल्पाच्या जलवाहिनीवर सातत्याने गळती होत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ जात आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी दुपारपर्यंत पाण्याच्या लाईनच्या गळतीमुळे नागरिकांचे पाण्याविना अतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे भामाआसखेड प्रकल्पातून पाणी पुरवठा होणाऱ्या वडगावशेरी, लोहगाव, विमाननगर भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरूवारी (दि. 22) सुरू राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

वडगावशेरी मतदार संघातील भामा आसखेडच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये गेल्या वर्षभरात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अपुरा पाणी पुरवठा होत आहे. चाकरमान्यांची, गृहिनींची गैरसोय होत आहे. भामा आसखेडच्या परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. परिणामी पाणीपुरवठा होत नाही. भामा आसखेडच्या लाईनवर सातत्याने गळती होत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ जात आहे. तोपर्यंत नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.  

गेल्या आठवडयात गुरुवारी पाणी पुरवठा बंद होता. शुक्रवारी पूर्ण दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारपर्यंत पाण्याच्या लाईनच्या गळतीमुळे नागरीकांचे पाण्याविना अतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या गुरुवारी (दि. 22) पुणे शहरात होणारा पाणी कपातीचा निर्णय भामा आसखेड परिसरात लागू नये, अशी मागणी पालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह अनेक नागरिकांनी केली होती.  नागरिकांची  पाण्याची गैरसोय होउ नये यासाठी गुरूवारी वडगावशेरी, लोहगाव, विमाननगर भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरूवारी सुरू राहणार आहे असे  पुणे महापालिकेेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी