शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Pune Water supply: पुणे शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

By निलेश राऊत | Updated: August 23, 2022 16:30 IST

शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

पुणे: शहरातील जलकेंद्रातील विद्युत व पंपिंग विषयक कामांबरोबरच टाक्यांच्या व जलवाहिन्यांची कामे करावयाची असल्याने, येत्या गुरुवारी (दि. २५ ऑगस्ट) शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे जीएसआर टाकी परिसर, एसएनडीटी, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग अखत्यारीतील पर्वती एमआयआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकर जलकेंद्र,चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत/ पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र व टाकी परिसर :- पाषाण टाकी. भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, मधूवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, बावधन परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड, इत्यादी.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, पाॅप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड,एसएनडीटी (एच.एल. आर व एम.एल.आर.) :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बॅंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, कर्वेरोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी, इत्यादी.

पर्वती एमएलआर टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ. काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ इ.नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टोनमेंट संपूर्ण परिसर.

चतुश्रृंगी टाकी परिसर :- औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंघ सोसायटी

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक