शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसा योजनेच्या पंपांना पाणीच पुरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:13 IST

पाणी मागणीत वाढ : मात्र वेळेवर मिळेना, पिके जळाली

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पंपांना पाणी पुरत नसल्याने नाईलाजास्तव ही योजना वारंवार बंद करावी लागते. यामुळे पाण्याची मागणी वाढवूनदेखील वेळेवर पाणी मिळत नाही. यामुळे पिके जळाली आहेत. पंपांना लेवल येऊन ही योजना सोळा तासांनंतर सुरू झाली.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे तीन पंप सुरू झाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाणी सुरू आहे. राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना वीजबिलाच्या थकबाकीमुळे अडचणीत आल्या आहेत. यामुळे राज्य शासन उपसा सिंचन एकूण वीजबिलाच्या ८१% भार सोसत असून, लाभार्थी शेतकऱ्यांनी १९% रक्कम भरून पाणी घेत आहे. यामुळे यंदा पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.मुळा-मुठा नदीवर ढापे बसवणे गरजेचे४पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याची नदीवरील लेवल व्यवस्थित टिकवायची असेल तर आॅक्टोबर महिन्यात मुळा-मुठा नदीवर ढापे बसवणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात साठवण्यात मदत झाली असती. मात्र पाणी साठवण्याचे काम उशिरा करण्यात आले. यामुळे तिसºया पंपाला मुहूर्त साधता आला नाही. यंदा दोन पंपांद्वारे पाणी देण्यात आले.४यंदा मार्च महिनाअखेरीस दोन पंपही चालणे मुश्कील झाले. पाण्याची लेवल वारंवार कमी होत असल्याने एक पंप बंद करण्यात आला, तर एकच सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पाणी लेवल एकदम कमी झाल्याने ही योजना बंद करण्यात आली.४माळशिरस वितरिका, राजेवाडी वितरिका व दिवे वितरिकेला पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र एका पंपालादेखील पाणी पुरेल एवढाही पाणीपुरवठा नदीतून साठवण होत नाही. त्यानंतर काही तासांतच नदीवरील पाण्याची लेवल कमी झाल्याने चालू असणारा दुसरा पंपही बंद करण्यात आला. यामुळे पाणी लेवल कमी झाल्याने ही योजना बंद करण्यात आली.४पाण्याची मागणी भरमसाट वाढली असताना योजना बंद होत असल्याने पाणीवाटप करायचे कसे, हा प्रश्न अधिकारीवर्गाला पडला आहे. सोळा तासांनंतर नदीवरील पाण्याची लेवल जागेवरती आल्यानंतर ही योजना नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या चेहºयावर हास्य फुलले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी