पुणोकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा?

By Admin | Updated: July 8, 2014 23:49 IST2014-07-08T23:49:49+5:302014-07-08T23:49:49+5:30

पावसाने दडी मारल्यामुळे खडकवासल्यासह चारही धरणांनी तळ गाठला आहे.

Water supply to one day water supply? | पुणोकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा?

पुणोकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा?

पुणो : पावसाने दडी मारल्यामुळे खडकवासल्यासह चारही धरणांनी तळ गाठला आहे. सध्या एक महिना पुरेल इतका 1.3क् टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, पुढील आठवडाभरात पुरेसा पाऊस न झाल्यास एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाची नामुष्की ओढवणार आहे. त्यासाठीचा आपत्कालीन पाणीपुरवठा 
आराखडा प्रशासनाकडून तयार केला जाणार आहे.  
पुणो शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रत पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, अद्यापही जोराचा पाऊस सुरू झालेला नाही.  त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून केवळ 1.3क् टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आणखी दोन दिवस (1क् जुलैर्पयत) पावसाची प्रतीक्षा करण्यात येईल. त्यानंतरही पाऊस न झाल्यास आणखी पाणीकपातीचा कठोर निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक घ्यावी लागणार आहे, असे महापौर चंचला कोद्रे यांनी मंगळवारी सांगितले. 
दरम्यान, गेल्या आठवडय़ापासून शहरात एक वेळ पाणीकपात सुरू आहे. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत पावसाने हजेरी न लावल्यास पुणोकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाला समोरे जावे लागेल. 2क्क्9 साली जूनअखेर चार धरणांत मिळून क्.6क् टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्या वेळी पाणीपुरवठा अधिका:यांनी आपत्कालीन आराखडय़ाची तयारी केली होती. त्यानंतर मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. 
या वर्षी जुलैच्या दुस:या आठवडय़ातही धरणक्षेत्रत तुरळक पाऊस आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला गळती थांबविण्याबरोबरच पर्यायी स्नेतांची माहिती घ्यावी लागणार आहे. तसेच, पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल करावा 
लागेल. त्याचप्रमाणो शहरात 1क् 
ऐवजी 2क् टक्के पाणीकपात करावी लागणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
धरण क्षेत्रत 
तुरळक पाऊस..
4पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजेर्पयत नाझरे धरण परिसरात 11 मिमी, उजनी धरण परिसरात 2क् मिमी आणि पवना धरण परिसरात 1 मिमी तुरळक पाऊस झाला आहे.
 
पानशेतक्.58
वरसगावक्
टेमघरक्
खडकवासलाक्.72
एकूण शिल्लक साठा1.3क् टीएमसी

 

Web Title: Water supply to one day water supply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.