लोहगाव स्टेशनला मीटरने पाणीपुरवठा

By Admin | Updated: September 1, 2014 05:11 IST2014-09-01T05:11:47+5:302014-09-01T05:11:47+5:30

लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनला जादा पाणी देण्याची तयारी महापालिकेने दाखविली आहे

Water supply to Lohagaon station | लोहगाव स्टेशनला मीटरने पाणीपुरवठा

लोहगाव स्टेशनला मीटरने पाणीपुरवठा

पुणे : लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनला जादा पाणी देण्याची तयारी महापालिकेने दाखविली आहे. परंतु, त्यासाठी मीटर पद्धतीने नळजोड देण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाला शनिवारी दिले.
महापालिका व एअर फोर्स स्टेशनच्या अधिकाऱ्यांची प्रलंबित प्रश्नांविषयी बैठक झाली. त्या वेळी आयुक्त कुणाल कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विंग कमांडर अभिजित चौधरी, स्कॉर्डन लिडर अस्मिता धावडे, उपायुक्त अनिल पवार, आर. टी. शिंदे व विजय दहिभाते आदी उपस्थित होते.
लोहगाव विमानतळ परिसरातील विविध चौक, विमानतळ ते वाघोलीचा जोडरस्ता व वाढीव पाणीपुरवठ्याविषयी चर्चा झाली. वाढीव पाणीपुरवठा मीटर पद्धतीने द्यावा. तसेच, पाणीगळतीची तपासणी करावी. रस्त्यासाठीच्या जागांचे सर्वेक्षण करून जमिनीचे मूल्य ठरविण्यात यावे. शासनाच्या मान्यतेने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, चौकांचे सुशोभीकरण व ड्रेनेजच्या कामांची पाहणी करून प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश कुणाल कुमार यांनी दिले.

Web Title: Water supply to Lohagaon station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.