शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवापरावर पुन्हा घसरले जलसंपदामंत्री, काटकसरीचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 04:24 IST

माणशी १५५ लिटर पाणी योग्य आहे. पुणेकरांना मात्र माणशी ३३५ लिटर पाणी मिळते. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे; प्रत्यक्षात मात्र १७.५० टीएमसी पाणी घेतले जाते, अशी टीका करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्यावरून टोकले.

पुणे - माणशी १५५ लिटर पाणी योग्य आहे. पुणेकरांना मात्र माणशी ३३५ लिटर पाणी मिळते. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे; प्रत्यक्षात मात्र १७.५० टीएमसी पाणी घेतले जाते, अशी टीका करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्यावरून टोकले.भविष्यात पाण्यावरून युद्धे होणार आहेत; त्यामुळे आतापासूनच पाणी जपून वापरा, असा सल्लाही त्यांनी दिला. महापालिकेने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात उभारलेल्या ५०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थानिक नगरसेवक शंकर पवार, अनिता कदम तसेच अन्य नगरसेवक, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली आदी या वेळी उपस्थित होते.वॉटर आॅडिट करण्याची गरजही महाजन यांनी या वेळी व्यक्त केली. शुद्ध पाणी देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र पुणेकरांची शुद्ध पाण्याची गरज भागविणार, हे चांगलेच आहे. मात्र, त्याचबरोबर पाणी वाचविण्यासाठीचे सर्व उपायही महापालिकेने करावेत, अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेतला. पुणेकरांना व्यवस्थित पाणी मिळवून देऊ, हे आश्वासन या केंद्राच्या माध्यमातून पूर्ण करीत आहोत; २४ तास पाणी मिळण्याच्या योजनेचाच हा एक भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.केंद्राच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महापालिका, महावितरण तसेच अन्य खात्यांतील अधिकाऱ्यांचा या वेळी महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरीश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. धेंडे यांनी आभार मानलेबेसुमार वापर थांबवायला हवापुणेकरांनी पाणी जपून वापरावे. बोगदा करून त्यातून खडकवासला ते पर्वती पाणी आणले, तर किमान ३ टीएमसी पाण्याची बचत होईल. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पिण्यासाठी, शेतीसाठी व मग उद्योगांसाठी, असा पाण्याचा प्राधान्यक्रम आहे. त्याप्रमाणे निर्णय घेतला तर शेतकरी नाराज होतात. त्यातून संघर्ष उभा राहतो. सुदैवाने मागील वर्षी पाऊस चांगला झाला; त्यामुळे सध्या तरी स्थिती चांगली आहे. मात्र, पाण्याचा बेसुमार वापर थांबायला हवा. - गिरीश महाजन, जलसंपदामंत्रींमहापौर नाशिकच्या!महाजन यांनी बोलताना मुक्ता टिळक यांचा ‘नाशिकच्या महापौर’, तर त्यानंतर काही वेळाने सौरभ राव यांचा ‘नागपूरचे आयुक्त’ असा उल्लेख केला. दोन्ही वेळा प्रेक्षागृहात हशा झाला. दुसºया वेळी ‘पुणे-पुणे’ असे सांगत व्यासपीठावरील काहींनी दुरुस्ती केली. महाजन यांनी त्यावर ‘मी नाशिकचा पालकमंत्री असल्यामुळे नाशिकचे नाव येते व राव काही वर्षांपूर्वी नागपूरला होते; त्यामुळे त्यांचा तसा उल्लेख झाला,’ असे स्पष्ट केले.खासदार शिरोळे यांनी, ‘पुणे महापालिकेची अनेक कामे जलसंपदाकडे आहेत. ती त्यांना मंजूर करावीत,’ अशी मागणी केली. आमदार मिसाळ यांनी, ‘पुणेकरांच्या पाण्यावर ते जास्त पाणी वापरतात म्हणून टीका होते; मात्र पाण्याची गळती किती तरी जास्त प्रमाणात होते व प्रत्यक्षात पुणेकरांना अपेक्षित पाणी मिळतच नाही,’ असे सांगितले. भिमाले यांनी नदीकाठसंवर्धन तसेच महापालिकेच्या अन्य काही योजनांसाठी जलसंपदाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे आहे, ते महाजन यांनी मिळवून द्यावे, अशी मागणी केली.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई