शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पवना नदीवर बंधाऱ्यांना जलसंपदा विभागाची मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:01 IST

सध्याच्या स्थितीत ४९० एमएलडी पाणी महानगरपालिका रावेत बंधाऱ्यातुन उचलते. या बंधाऱ्यालगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती.

ठळक मुद्देपिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठाउर्से व शिवणे येथे कोल्हापुर पद्धतीचे बंधारे बांधुन पाणी साठवण करणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्याचे आयुर्मान संपल्याने त्या शेजारी नवीन बंधारा बांधण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. पवना प्रकल्प बंद जलवाहिनी योजनेच्या अंतर्गत उर्से व शिवणे या ठिकाणी कोल्हापुर पध्दतीची बंधारे बांधण्यासही मंजूरी दिली आहे. पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्याच्या स्थिती त ४९० एमएलडी पाणी पिंपरी चिंचवड महानगपालिका रावेत बंधाऱ्यातुन उचलते. या बंधाऱ्यालगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २०१३ मध्ये जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती. जलसंपदा विभागाने यास परवानगी दिली नव्हती. तसेच पवना प्रकल्प बंद पाईप लाईन योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र जलसंपदा नियम प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार उर्से व शिवणे या ठिकाणी कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधावेत या संदर्भात तत्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी केली होती.या प्रश्नासंदर्भात झालेल्या मुंबई येथील बैठकीस जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, महानगरपालिकेचे सहशहर अभियंता पाणी पुरवठा व जलनिसरण विभागाचे रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा रामदास तांबे उपस्थित होते.महापालिकेला पवना धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. पवना प्रकल्प बंद पाईप योजनेचे काम पूर्ण बंद पडले आहे. पिंपरी चिंचवड शहराला रावेत बंधारा येथून पाणी उचलत पाणीपुरवठा केला जातो. एक दिवस पुरेल एवढाच पाण्याचा साठा या बंधाऱ्यावर उपलब्ध असतो. रावेत बंधारा ब्रिटीश काळातील असुन १०० वर्षांपेक्षा जास्त दिवस या बंधाऱ्याला झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या निकषानुसार या बंधाऱ्याची वयोमर्यादा संपली आहे. बंधाऱ्यालगत नवीन बंधारा बांधण्यासाठी महानगरपालिका २०१३ पासुन पाठ पुरावा करत आहे. मात्र, जलसंपदा विभागाने परवानगी दिलेली नाही. खासदार बारणे म्हणाले, नव्याने बंधारा बांधण्यास परवानगी दिली आहे. तसेच उर्से व शिवणे येथे कोल्हापुर पद्धतीचे बंधारे बांधुन पाणी साठवण करणार असुन त्याचा शेतीलाही उपयोग होईल. हा बंधारा बाधण्यासाठी जलसंपदा विभागाकडुन अंदाज पत्रक महापालिकेकडे आठ दिवसात सादर करण्यात येणार आहे. 

  

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीDamधरणravetरावेतurseउर्से